इंग्लंड विरुद्ध भारत या दोन्ही संघांमध्ये लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना सुरू आहे. या सामन्यातील पहिला दिवस( १२ ऑगस्ट ) पूर्णपणे भारतीय फलंदाजांनी गाजवला. तर सामन्याच्या दुसऱ्या दिवशी (१३ ऑगस्ट) देखील भारतीय फलंदाजांनी अप्रतिम फलंदाजी सुरू ठेवली आहे. परंतु, दुसऱ्या दिवशी लॉर्ड्सचे मैदान लाल रंगात रंगल्याचे पाहायला मिळाले आहे. काय आहे यामागील कारण? घ्या जाणून.
लॉर्ड्सच्या मैदानावर सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी दोन्ही संघातील खेळाडू लाल रंगाची कॅप आणि लाल रंगाची प्लेइंग अंक असलेली विशेष जर्सी घालून मैदानात उतरले आहेत. दुसऱ्या दिवशी ( १३ ऑगस्ट) लॉर्ड्सच्या मैदानावर ‘रेड फॉर रूथ’ दिवस साजरा केला जात आहे.
माजी इंग्लिश कर्णधार अँड्र्यू स्ट्रॉस याची पत्नी रूथ २०१८ मध्ये कर्करोगाने निधन पावली होती. या प्रकारच्या आजाराचे संशोधन करण्यासाठी आणि पीडित कुटुंबातील व्यक्तींना मदत करण्यासाठी स्ट्रॉसने ‘रूथ स्ट्रॉस फाउंडेशन’ची स्थापना केली होती. या फाऊंडेशनव्दारे या भयंकर आजाराविषयी जनजागृती केली जाते.
हा कसोटी सामना पाहण्यासाठी अँड्र्यू स्ट्रॉसने लाल रंगाच्या कोटमध्ये आपली दोन मुले सॅम आणि लुकासह हजेरी लावली आहे. या फाउंडेशनद्वारे देशभरातील हजारो कुटुंबियांपर्यंत मदत पोहचवली जाणार आहे. तसेच आरोग्य सेवकांना प्रशिक्षक देण्याचे देखील काम केले जाणार आहे.(Why lords are painted red Today,click here to know the reason)
दुसऱ्या दिवशीही भारतीय संघ मजबूत स्थितीत
पहिल्या दिवस अखेर भारतीय संघाला ३ बाद २७६ धावा करण्यात यश आले होते.पहिल्या दिवशी शतक झळकावणारा केएल राहुल दुसऱ्या दिवशी मोठी खेळी खेळणार अशी अपेक्षा व्यक्त केली गेली होती. परंतु तो १२९ धावा करत माघारी परतला. तसेच उपकर्णधार अजिंक्य रहाणे या सामन्यात देखील पुन्हा एकदा फ्लॉप ठरला आहे,त्याला एकच धाव करता आली. रिषभ पंत ३७ धावांवर बाद झाला. भारतीय संघाने दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्राखेर ७ बाद ३४५६ धावांपर्यंत मजल मारली.
महत्त्वाच्या बातम्या –
रोहित बनणार कसोटी संघाचाही उपकर्णधार? ‘हे’ आहे कारण
Video: विराटला ७१ व्या शतकाची अजून करावी लागेल प्रतीक्षा, ‘असा’ झाला रॉबिन्सनविरुद्ध आऊट
ब्रेकींग! विश्वविजेत्या भारतीय कर्णधार उन्मुक्त चंदने केली निवृत्तीची घोषणा