शुक्रवार (दि. 23 जून) हा दिवस भारतीय क्रिकेटसाठी खूप महत्त्वाचा होता. कारण, डब्ल्यूटीसी अंतिम सामन्यात पराभूत झाल्यानंतर भारतीय संघ वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यापूर्वी भारताने शुक्रवारी कसोटी आणि वनडेसाठी आपला संघ जाहीर केला. या संघातून अनेक अनुभवी खेळाडूंना बाहेर काढले आहे. त्यामध्ये मोहम्मद शमी याच्या नावाचाही समावेश आहे. शमीने अलीकडच्या काळात उत्कृष्ट गोलंदाजी केली आहे, तरीही त्याचे नाव कसोटी आणि वनडे संघात नसल्याने चाहते हैराण आहेत. आता शमी वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत नसल्याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.
वेस्ट इंडिज दौऱ्यातून शमी बाहेर का?
खरं तर, मोहम्मद शमी (Mohammad Shami) याला विश्रांती देण्यात आली आहे. शमीला जवळपास तीन महिन्यांच्या व्यस्त प्रतिस्पर्धी क्रिकेटनंतर कसोटी आणि वनडे दोन्ही प्रकारासाठी विश्रांती दिली आहे. खरं तर, वर्षाच्या अखेरीस वनडे विश्वचषक 2023 (ODI World Cup 2023) स्पर्धाही आहे. अशात शमीला विश्रांती देऊन त्याला आगामी मोठ्या स्पर्धेसाठी तयार राहण्यास सांगण्यात आले आहे.
शमीने आतापर्यंत 2023 या वर्षात 8 वनडे सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने 30च्या सरासरीने एकूण 10 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच, 2022नंतर त्याने 11 वनडे सामन्यात 29.78च्या सरासरीने आणि 5.41च्या इकॉनॉमी रेटने 14 विकेट्स घेतल्या आहेत. शमी सध्याच्या घडीला जसप्रीत बुमराहच्या अनुपस्थितीत भारताचा सर्वात अनुभवी वेगवान गोलंदाज आहे.
तसेच, दीपक चाहर यालाही वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेसाठी संघात सामील करण्यात आले नाहीये. कदाचित चाहरला टी20 मालिकेसाठी संधी मिळू शकते. चाहरने आयपीएल 2023 हंगामात चेन्नई सुपर किंग्स संघासाठी शानदार कामगिरी केली होती. त्याने आयपीएल 2023मध्ये 10 सामन्यात 8.73च्या इकॉनॉमी रेटने 13 विकेट्स घेतल्या होत्या. चाहरने आतापर्यंत 2022च्या सुरुवातीनंतर 8 वनडे सामने खेळले आहेत. तसेच, त्यात 10 विकेट्स घेतल्या आहेत. वनडेत चाहरपेक्षा कमी अनुभव असणाऱ्या मुकेश कुमार, उमरान मलिक आणि जयदेव उनाडकट यांसारख्या गोलंदाजांना सामील करण्यात आले आहे. खरं तर, निवडकर्त्यांनी उमेश यादव याला संघाबाहेर केले आहे. तसेच, मुख्य संघात वेगवान गोलंदाज मुकेश कुमार याला संधी दिली आहे. (why was pacer mohammad shami not picked indias odi squad for west indies )
महत्वाच्या बातम्या-
टीम इंडियात निवड झाल्यानंतर आली यशस्वीची प्रतिक्रिया, म्हणाला, “त्या तिघांकडून खूप शिकलो”
जशी कमाई, तसा खर्च! विराटच्या नवीन घड्याळाची किंमत ऑडी कारच्या किंमतीपेक्षा जास्त, आकडा तर वाचाच