Hardik Pandya Jersey Number: हार्दिक पंड्या सध्या भारतीय संघाचा नंबर वन अष्टपैलू खेळाडू आहे आणि त्याच्या उपस्थितीने संघ खूप संतुलित दिसतो. संघाचा कर्णधार रोहित शर्मा देखील सहमत आहे की हार्दिकच्या उपस्थितीमुळे संघाला अतिरिक्त गोलंदाज आणि फलंदाजीचा पर्याय मिळतो ज्यामुळे संघाला फायदा होतो. पायाच्या शस्त्रक्रियेमुळे तो बराच काळ क्रिकेटपासून दूर आहे, पण आता तो तंदुरुस्त होत आहे आणि ॲक्शनसाठी तयार आहे.
हार्दिक पंड्या याने काही दिवस 228 क्रमांकाची जर्सी परिधान केली होती आणि त्याबद्दल बरीच चर्चा झाली होती पण आता त्याने ती बदलून 33 केली आहे. सहसा खेळाडू असे करत नाहीत, पण हार्दिकने तसे केले पण त्याने 228 क्रमांकाची जर्सी घालणे का निवडले हा प्रश्न आहे. पण सध्या मुंबई इंडियन्सने पंड्याचा एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये त्याच्या जर्सीवर 228 हा क्रमांक आहे.
T20I debuts for 𝐁𝐎𝐎𝐌 & 𝐇𝐏 #OnThisDay in 𝟐𝟎𝟏𝟔 🤝🔥
But, who was it against, Paltan? 🤔#OneFamily #MumbaiIndians @Jaspritbumrah93 @hardikpandya7 pic.twitter.com/xdeMdYTCL8
— Mumbai Indians (@mipaltan) January 26, 2024
2020 मध्ये आयसीसीने या फोटोवर एक प्रश्न विचीरला होता. आयसीसीच्या या प्रश्नाचे उत्तर एका क्रिकेट चाहत्याने आपल्या ट्विटद्वारे दिले आहे. त्याने लिहिले की, हार्दिकचे हे एकमेव द्विशतक आहे जे त्याने बडोदा अंडर-16 संघासाठी मुंबई अंडर-16 संघाविरुद्ध झळकावले होते. त्या सामन्यात हार्दिकने 391 चेंडूत 228 धावांची खेळी केली होती आणि तो धावबाद झाला होता. तो 2009 मध्ये रिलायन्स क्रिकेट स्टेडियमवर विजय मर्चंट अंडर-16 ट्रॉफी स्पर्धेत खेळला होता यावेळी तो संघाचा कर्णधारही होता.
तर हार्दिक पंड्याच्या जर्सी क्रमांक 228 बद्दल सांगताना त्याचा भाऊ कुणाल म्हणतो, “हार्दिकच्या क्रिकेट कारकिर्दीतील ही सर्वोच्च धावसंख्या आहे. मुंबईविरुद्ध त्याने ही धावसंख्या केली होती. ही खेळी त्याच्या क्रिकेट कारकिर्दीतील सर्वात संस्मरणीय खेळी आहे. म्हणून जेव्हा त्याला जर्सी क्रमांक निवडण्याची संधी मिळाली तेव्हा त्याने 228 क्रमांक निवडला.”
हेही वाचा
अर्रर्र: भारतीयांसाठी शरमेची बाब, इंग्लंड चाहत्यांनी केली ‘या’ गोष्टीची तक्रार
मुलगा स्टार भारतीय क्रिकेटर, पण बाप तरीही वाहतोय सिलिंडर, पाहा व्हायरल व्हिडीओ