वेस्टइंडीज आणि भारत यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील दुसरा सामना कोर्ट ऑफ स्पेन येथे सुरू झाला. वेस्ट इंडीजचा कर्णधार निकोलस पूरनने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पहिला सामना जिंकलेल्या भारतीय संघाने आपल्या अंतिम ११ मध्ये एक बदल केला. वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाच्या जागी आवेश खान याला वनडे पदार्पणाची संधी देण्यात आली.
पोर्ट ऑफ स्पेन येथील या सामन्यात भारतीय संघामध्ये एक बदल करण्यात आला. वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा याच्या जागी युवा वेगवान गोलंदाज आवेश खान याला संधी मिळाली. आवेश भारतासाठी वनडे खेळणारा २४४ वा खेळाडू बनला. या दुसऱ्या सामन्यातही यष्टीरक्षक इशान किशन याला संघात स्थान मिळाले नाही. दुसरीकडे वेस्ट इंडीजने गोदकेश मोटीऐवजी अनुभवी लेग स्पिनर हेडन वॉल्श याला अंतिम अकरामध्ये स्थान दिले. या सामन्यात विजय मिळवून भारतीय संघ मालिका खिशात घालण्याचा प्रयत्न करेल.
दुसऱ्या सामन्यासाठी उभय संघ-
भारत- शिखर धवन (कर्णधार), शुबमन गिल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन, दीपक हुडा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, युझवेंद्र चहल, आवेश खान.
वेस्ट इंडीज- शाई होप, ब्रॅंडन किंग, शमारह ब्रूक्स, काइल मेयर्स, निकोलस पूरन (कर्णधार), रोवमन पॉवेल, अकील होसेन, रोमारियो शेफर्ड, अल्झारी जोसेफ, जेडेन सील्स, हेडन वॉल्श.
One change in the #TeamIndia Playing XI from the previous game.
Avesh Khan makes his debut and Prasidh Krishna sits out for the game.
Live – https://t.co/EbX5JUciYM #WIvIND pic.twitter.com/o3SGNrmQBd
— BCCI (@BCCI) July 24, 2022
उभय संघांमध्ये झालेल्या पहिल्या सामन्यात अत्यंत अटीतटीचा खेळ पाहायला मिळाला होता. भारतीय संघाने कर्णधार शिखर धवन, उपकर्णधार श्रेयस अय्यर व शुबमन गिल यांच्या खेळाच्या जोरावर ३०८ पर्यंत मजल मारलेली. प्रत्युत्तरात यजमान संघाने चांगला प्रतिकार केला. मात्र, भारतीय गोलंदाजांच्या चमकदार कामगिरीमुळे त्यांना ३ धावांनी पराभव पत्करावा लागला.
महत्त्वाच्या बातम्या –
‘तो रिषभ पंत नाही, दोघांत खूप अंतर’, खराब प्रदर्शनावरुन पाकिस्तानी दिग्गजाचा सॅमसनवर निशाणा
जडेजा म्हणतोय ‘धवनला भारतीय संघात घेऊच नका’, धिम्या खेळीवरून साधला थेट निशाणा
भारताचा कर्णधार रोहित शर्मा कुटुंबासोबत मग्न, पत्नी रितीकासोबतचे फोटो केले शेअर