Andre Russell Against England T20: इंग्लंड क्रिकेट संघ वेस्ट इंडिज दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात 3 वनडे आणि 5 टी20 सामन्यांची मालिका खेळली जात आहे. वनडे मालिका संपली असून टी20 मालिकेतील पहिला सामना मंगळवारी (दि. 12 डिसेंबर) बार्बाडोस येथे पार पडला. या सामन्यात वेस्ट इंडिजने इंग्लंडला 4 विकेट्सने पराभवाचा धक्का दिला. तसेच, मालिकेत 1-0ने आघाडी घेतली. विशेष म्हणजे, या विजयाचा शिल्पकार आंद्रे रसेल ठरला. अष्टपैलू प्रदर्शनासाठी आंद्रे रसेल सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. खरं तर, आंद्रे रसेल 2 वर्षांनंतर पुनरागमन करत आहे.
विंडीजपुढे होते 172 धावांचे आव्हान
या सामन्यात यजमान वेस्ट इंडिज (West Indies) संघाने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला. तसेच, इंग्लंड (England) संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. यावेळी इंग्लनेड 19.3 षटकात सर्व विकेट्स गमावत 171 धावा केल्या. इंग्लंडचे 172 धावांचे आव्हान वेस्ट इंडिजने 18.1 षटकात 6 विकेट्स गमावत पार केले. विंडीजने बार्बाडोसमधील सर्वात मोठ्या आव्हानाचा यशस्वीरीत्या पाठलाग केला. यापूर्वी त्यांनी बार्बाडोसमध्ये 2014 साली इंग्लंडविरुद्ध 155 धावांचा यशस्वी पाठलाग केला होता.
आंद्रे रसेल विजयाचा हिरो
वेस्ट इंडिज संघाच्या विजयाचा हिरो आंद्रे रसेल (Andre Russell) ठरला. तो 2021 टी20 विश्वचषक स्पर्धेनंतर पहिल्यांदा टी20 सामना खेळला. पुढील वर्षी जूनमध्ये होणाऱ्या टी20 विश्वचषकापूर्वी संघात सामील होण्यासाठी सज्ज असलेल्या रसेलने निराश नाही केले. त्याने कर्णधार रोवमन पॉवेल आणि मुख्य प्रशिक्षक डॅरेन सॅमी यांचा विश्वास सार्थ ठरवला.
ANDRE RUSSELL IS BACK…..!!!! 🔥
Playing his first T20I after 2 long years, he took 3 for 19 from 4 overs and 29*(14) against Defending Champions England. pic.twitter.com/QjnqODtKv7
— Johns. (@CricCrazyJohns) December 13, 2023
त्याने वेस्ट इंडिजसाठी या सामन्यात शानदार गोलंदाजी केली. त्याने 4 षटकात 19 धावा खर्च करत 3 विकेट्स घेतल्या. एवढंच नाही, तर अष्टपैलू रसेलने फलंदाजीतही आपला दम दाखवत फिनिशरची भूमिका निभावली. त्याने फक्त 14 चेंडूंचा सामना करताना नाबाद 29 धावांचा पाऊस पाडला आणि वेस्ट इंडिजला संकटातून बाहेर काढत विजय मिळवून दिला. (wi vs eng all rounder andre russell shines on comeback west indies beats england in first t20)
हेही वाचा-
सिक्स असा मारा की, काच तुटली पाहिजे! रिंकू सिंगच्या षटकाराने केले मीडिया बॉक्सचे नुकसान, व्हिडिओ पाहाच
दक्षिण आफ्रिकेत झाला ‘सूर्या’उदय! धोनीलाही न जमलेली कामगिरी सूर्याने करून दाखवली, कौतुकच कराल