वेस्ट इंडीज आणि भारत यांच्यातील शेवटचा टी-20 सामना रविवारी (13 ऑगस्ट) खेळला जात आहे. फ्लॉरिडामध्ये खेळल्या गेलेल्या चौथ्या टी-20 सामन्यात भारता 9 विकेट्सने विजय मिळवला होता. मालिकेतील पाचवा सामनाही याच ठिकाणी खेळला जात असून नाणेफेक भारतीय संघाने जिंकली आणि प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. या निर्णायक सामन्यातही भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये एकही बदल नसेल, असे हार्दिकने नाणेफेक जिंकल्यानंतर स्पष्ट केले.
भारतीय संघ मागच्या दोन सामन्यांपासून त्याच प्लेइंग इलेव्हनसह खेळत आहे. शेवटच्या सामन्यात कर्णधार आणि संघ व्यवस्थापनाने आपल्या संघावर विश्वस दाखवत एकही बदल केला नाहीये. अशात खेळाडूंचे प्रदर्शन पाहण्यासारखे असेल. दुसरीकडे वेस्ट इंडीज संघात रोस्टन चेस याला संधी दिली गेली आहे. ओडियन स्मिथ याच्या जागी चेसला प्लेइंग इलेव्हनचा भाग बनवले गेले आहे. तसेच अलझारी जोसेफ याला ओबेड मेकॉय याच्या जागी संघात घेतले गेले आहे. (WI vs IND 5th t20i India won the toss and chose to bat first.)
A look at #TeamIndia's Playing XI for the decider 👌
Follow the match – https://t.co/YzoQnY7mft#WIvIND pic.twitter.com/2VeXuzEowS
— BCCI (@BCCI) August 13, 2023
दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन –
वेस्ट इंडीज – ब्रँडन किंग, काइल मेयर्स, शाई होप, निकोलस पूरन (यष्टीरक्षक), रोव्हमन पॉवेल (कर्णधार), शिमरॉन हेटमायर, जेसन होल्डर, रोमारियो शेफर्ड, रोस्टन चेस, अकेल हुसेन, अलझारी जोसेफ.
भारत – यशस्वी जयसवाल, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव, टिळक वर्मा, हार्दिक पंड्या (कर्णधार), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), अक्षर पटेल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, युझवेंद्र चहल, मुकेश कुमार.
बातमी अपडेट होत आहे…
महत्वाच्या बातम्या –
विश्वचषकासाठी वनडे निवृत्तीतून माघार घेणार बेन स्टोक्स? लवकरच होणार संघाची घोषणा
वाद मिटला! स्वतः विराट म्हणाला, ‘बाबर जगात एक नंबर फलंदाज’, पहिल्या भेटीविषयी केला खुलासा