भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील कसोटी मालिका बुधवारी (12 जुलै) सुरू झाली. पहिला सामना डॉमिनिकामध्ये खेळला जात आहे. या सामन्याच्या पहिल्याच दिवशी भारताचा दिग्गज रविचंद्रन अश्विन याने मोठा विक्रम नावावर केला. अश्विनने या सामन्याच्या पहिल्याच दिवशी अल्झारी जोसेफ (Alzarri Joseph) याला अवघ्या चार धावांवर बाद केले आणि आपले नाव खास यादीत सामील केले.
रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 700 विकेट्स घेणारा तिसरा भारतीय गोलंदाज ठरला आहे. त्याच्या आधी ही कामगिरी फक्त अलिन कुंबळे आणि हरभजन सिंग यांनाच जमली होती. डॉमिनिका कसोटीच्या पहिल्या दिवशी रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) याने 4 विकेट्स घेतल्या. डावातील चौथी विकेट घेताच त्याच्या आंतरराष्ट्रीय विकेट्सचा आकडा 701* झाला. भारतासाठी सर्वाधिक विकेट्सचा विक्रम अनिल कुंबळेच्या नावावर आहे, ज्याने 953 विकेट्स घेतल्या आहेत. दुसऱ्या क्रमांकावरील हरभजन सिंगने 707 विकेट्स घेतल्या आहेत. लवकरच हरभजनचा हा विक्रम अश्विनकडून मोडीत निघणार, असे दिसते.
भारतीयाने सर्वाधिक आंतरराष्ट्रीय विकेट्स –
953 – अनिल कुंबळे
707 – हरभजन सिंग
701* – रविचंद्रन अश्विन
687 – कपिल देव
५९७ – झहीर खान
551 – जवागल श्रीनाथ
५१२* – रवींद्र जडेजा
434 – इशांत शर्मा
415 – मोहम्मद शमी
349 – अजित आगरकर
३१९ – जसप्रीत बुमराह
301 – इरफान पठाण
सामन्याचा एकंदरीत विचार केला, तर भारताने नाणेफेक गमावल्यामुळे संघाला प्रथम गोलंदाजी करावी लागली. प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडीजला चांगली सुरुवात मिळाली नाही. त्याच्या वरच्या फळीतील एकही फलंदाज 20 पेक्षा मोठी खेळी करू शकला नाही. एलिक अथानाझे (Alick Athanaze) खेळपट्टीवर सेड झाला असताना अश्विनने त्याच्या रुपात आपली चौथी शिकार केली. पहिल्या दिवशी चाहापाणापर्यंत वेस्ट इंडीजचा धावसंख्या 8 बाद 137 धावा होती. (Ashwin is the fastest to complete 700 wickets in terms of balls by an Indian bowler.)
महत्वाच्या बातम्या –
लायका कोवाई किंग्ज बनले टीएनपीएल 2023चे चॅम्पियन्स! कर्णधार शाहरुखचा खास सन्मान
भारतानं इंग्लंडला हरवलं अन् दादाने टी-शर्ट काढला, सोबतच्या खेळाडूलाही दिला होता सल्ला