भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यानंतर वेस्ट इंडिजला रवाना होणार आहे. या दौऱ्यात भारत तीन सामन्यांची वनडे आणि पाच सामन्यांची टी२० मालिका खेळली जाणार आहे. यासाठी बीसीसीआयने भारतीय संघांची घोषणा केली आहे. त्यानुसार वनडे मालिकेसाठी शिखर धवन संघाचे नेतृत्व करणार आहे, तर टी२० मालिकेत रोहित शर्माकडे संघाचे कर्णधारपद देण्यात आले आहे.
वेस्ट इंडिजच्या दौऱ्यासाठी भारताचा वनडे संघ आधीच घोषित केला असून टी२० मालिकेसाठी गुरूवारी (१४ जुलै)संघ जाहीर झाला आहे. या दोन्ही संघात सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) आणि दीपक हुड्डा (Deepak Hooda) यांचे स्थान कायम आहे. या मालिकेची सुरूवात वनडे सामन्याने होणार आहेत. पहिला सामना २२ जुलैला त्रिनिनाद येथे खेळला जाणार आहे. तर शेवटचा टी२० सामना ७ ऑगस्टला फ्लोरिडा येथे खेळला जाणार आहे.
हुड्डा आणि सूर्यकुमार यांनी केलेल्या चमकदार कामगिरीमुळे त्यांनी वेस्ट इंडिजच्या मालिकेत आपले स्थान कायम केले आहे. हुड्डाने आयर्लंड दौऱ्यात तर सूर्यकुमारने इंग्लंड विरुद्ध टी२० सामन्यांमध्ये शतके ठोकली आहेत.
इंग्लडं विरुद्धच्या पहिल्या टी२० सामन्यात सूर्यकुमारने ३९ तर हुड्डाने ३३ धावा केल्या होत्या. तसेच तिसऱ्या टी२० सामन्यात सूर्यकुमारने ११७ धावा केल्या होत्या. आयर्लंड दौऱ्यातील टी२० सामन्यात हुड्डाने १०४ आणि नाबाद ४७ धावा केल्या होत्या.
यावर्षी ऑस्ट्रेलियामध्ये खेळल्या जाणाऱ्या टी२० विश्वचषकासाठी भारतीय संघात जागा पक्की करण्याची दोघांकडे चांगली संधी आहे. तसेच दोघांची कामगिरी पाहता त्यांची टी२० विश्वचषकासाठीच्या संघात निवड होण्याची दाट शक्यता आहे.
हुड्डाने ६ आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यात ६८.३३च्या सरासरीने २०५ धावा केल्या आहेत. तर सूर्यकुमारने १९ टी२० सामन्यात ५३७ धावा केल्या आहेत. त्यामध्ये एक शतक आणि ४ अर्धशतकांचा समावेश आहे.
वेस्ट इंडीजविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी निवडलेला भारतीय संघ –
रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, दीपक हुड्डा, श्रेयस अय्यर, दिनेश कार्तिक, रिषभ पंत, हार्दिक पंड्या, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, कुलदिप यादव, आर अश्विन, भुवनेश्वर कुमार, आवेश खान, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग.
वेस्ट इंडीजविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी निवडला गेलेला भारतीय संघ –
शिखर धवन (कर्णधार), रवींद्र जडेजा (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, दीपक हुड्डा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, ईशान किशन (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), शार्दुल ठाकुर, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, आवेश खान, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंह.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
एकाच संघात ४ यष्टीरक्षक, पण यष्टीमागे पंतभाऊच उभा ठाकणार! पाहा कोण आहेत ते चौघे
WIvsIND। टी२० मालिकेसाठी कुलदीपबरोबर भारताच्या ‘या’ स्फोटक फलंदाजांचेही संघात पुनरागमन
आयसीसी क्रमवारीत अव्वल असलेला जसप्रीत बुमराह विंडीजच्या दौऱ्यातून बाहेर, कारण माहितीय का?