भारतीय संघ सध्या वेस्ट इंडिज दौऱ्यावर आहे. या दौऱ्याला 12 जुलैपासून 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेने सुरुवात होणार आहे. यापूर्वी वेस्ट इंडिज विरुद्ध भारत संघात सराव सामना खेळला गेला. यादरम्यान भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि पहिल्यांदाच कसोटी संघात सामील करण्यात आलेला यशस्वी जयसवाल यांनी शानदार प्रदर्शन केले. मात्र, दिग्गज फलंदाज विराट कोहली फार मोठी खेळी करू शकला नाही. त्यामुळे पुन्हा एकदा त्याची जुनी कमजोरी समोर आली आहे.
स्टम्पच्या बाहेर जाणाऱ्या चेंडूवर संघर्ष करताना दिसला विराट
भारतीय संघाला जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता. त्या सामन्यात विराट कोहली (Virat Kohli) स्टम्पच्या बाहेर जाणारा चेंडू खेळताना बाद झाला होता. आता सराव सामन्यातही तो अशाचप्रकारे बाद झाला. जयदेव उनाडकट याने त्याला आपल्या जाळ्यात अडकवले. यावेळी विराट स्लीपमध्ये झेल देऊन बाद झाला. यावरून समजते की, विराट डावखुऱ्या वेगवान गोलंदाजांविरुद्ध ऑफ स्टम्पच्या बाहेर जाणाऱ्या चेंडूवर संघर्ष करताना दिसतो. त्याला लवकरच आपली ही कमजोरी दूर करावी लागेल.
भारतीय संघासाठी चांगली बातमी अशी की, कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि युवा फलंदाज यशस्वी जयसवाल (Yashasvi Jaiswal) चांगली फलंदाजी करताना दिसले. जयसवालने 76 चेंडूत 54 धावांची खेळी साकारली, तर रोहितनेही 24 धावा केल्या. तसेच, शुबमन गिल यानेही 27 धावांची खेळी साकारली. जयसवालने या प्रदर्शनानंतर प्लेइंग इलेव्हनमध्ये जागा बनवण्याची दावेदारी मजबूत केली आहे. त्याला संघात सामील केले जाऊ शकते.
वेस्ट इंडिज विरुद्ध भारत (West Indies vs India) संघात 12 जुलैपासून 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. पहिला कसोटी सामना डॉमिनिका येथे खेळला जाईल. तसेच, मालिकेतील दुसरा कसोटी सामना 20 जुलैपासून खेळला जाईल. त्यानंतर उभय संघात 27 जुलैपासून 3 सामन्यांची वनडे मालिका आणि 3 ऑगस्टपासून 5 सामन्यांची टी20 मालिका खेळली जाईल. (wi vs ind skipper rohit sharma and yashasvi jaiswal shines in practice match virat kohli out on 3 runs)
महत्वाच्या बातम्या-
कॅरेच्या हेअरकटच्या पैशांवरून वातावरण तापले! धमकी अन् इंग्लिश मीडियाच्या बातमीनंतर स्मिथकडून पोलखोल
वॉर्नरच्या Thread पोस्टवर कमिन्सने सल्ला देताच लोटपोट झाला रिषभ पंत; म्हणाला, ‘भावा…’