वेस्ट इंडीज आणि भारत यांच्यातील टी-२० मालिकेचा पहिला सामना ब्रायन लारा स्टेडियमवर खेळला गेला. शुक्रवारी खेळल्या गेलेल्या या सामन्यात भारताने ६८ धावांनी विजय मिळवला. अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक याने या सामन्यात तापतोड फलंदाजीचे प्रदर्शन केले, ज्यामुळे भारताला मोठी धावसंख्या उभी करता आली. विजयानंतर कार्तिकला सामनावीर देखील निवडले गेले. सामना संपल्यानंतर कार्तिक आणि रविचंद्रन अश्विन यांच्यात झालेली चर्चा सध्या व्हायरल होत आहे.
सामना संपल्यानंतर रविंचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) आणि दिनेश कार्तिक (Dinesh karthik) यांनी बीसीसीआय टीव्हीसाठी चर्चा केली. मुलाखतीच्या सुरुवातील अश्विन कार्तिकविषयी असे काही बोलला, ज्याकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले. उभय संघातील हा सामना ब्रायन लारा स्टेडियमवर खेळला गेला असून, त्यांनी २००७ साली क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती.
मुलाखतीच्या सुरुवातीला अश्विन म्हणाला की, “पहिला टी-२० सामना ब्रायन लारा (Brian Lara) क्रिकेट स्टेडियमवर खेळला गेला आहे. लाराने २००७ साली याच मैदानात निवृत्ती घेतला होती. पण या काळातील एक क्रिकेटपटू आजूनही खेळत आहे. तो आहे दिनेश कार्तिक, जो आपल्यासोबत उपस्थित आहे.” अश्विनच्या याच विधानावर चाहते वेगवेगळे अंदाज बांधत आहे. काहींच्या मते अश्विनने कार्तिकची फिरकी घेतली आहे, तर काहीच्या मते अश्विन त्याचे कौतुक करत आहे. बीसीसीआयच्या या पोस्टवर वेगवेगळ्या कमेंट्सही येत आहेत.
https://twitter.com/BCCI/status/1553265181207437312?s=20&t=64NDsncqLvLXHhiycBGLtw
कार्तिकने अलिकडच्या काळात आक्रामक फलंदाजी करताना दिसत आहे. त्याच्या फलंदाजीत झालेला बदल लक्षणीय आहे. अश्विनने याविषयी देखील कार्तिकला प्रश्न विचारला. यावर उत्तर देताना कार्तिक म्हणाला की, त्याची नजर आगामी काळात खेलल्या जाणाऱ्या टी-२० विश्वचषकावर आहे. कार्तिकने पुढे बोलताना संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचे कौतुक केले. त्याच्या मते संघात सद्या शांत आणि सकारात्मक वातावरण आहे. या वातावरणाचे श्रेय कार्तिकने द्रविड आणि रोहित या दोघांना दिले.
दरम्यान, सामन्याचा विचार केला, भारताने प्रथम फलंदाजी करताना ६ विकेट्सच्या नुकसानावर १९० धावा केल्या. कार्तिकने अवघ्या १९ चेंडूत ४१ धावांची खेळी केली, ज्यामथ्ये ४ चौकार आणि २ षटकारांचा समावेश होता. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेला वेस्ट इंडीज संघ २० षटकात १२२ धावांपर्यंत पोहचू शकला. यासाठी त्यांच्या ८ खेळाडूंनी विकेट्स गमावल्या.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
‘द्रविडच्या विचारांचा संघाला फायदा नाही’, महत्त्वाच्या खेळाडूला बाहेर ठेवल्यामुळे भडकला माजी दिग्गज
‘आता क्रिकेटपटूही वापरू लागलेत चायनीज साहित्य?’, व्हायरल व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट्स
टी २० विश्वचषकातून अश्विनची हाकालपट्टी? भारताच्या दिग्गजाने केलेल्या वक्तव्याने माजवली खळबळ