वेस्ट इंडिज विरुद्ध भारत संघात बुधवारपासून (दि. 12 जुलै) 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्याला सुरुवात होत आहे. हा सामना डॉमिनिका येथे खेळला जाणार आहे. तसेच, मालिकेतील दुसरा सामना पोर्ट ऑफ स्पेन येथील क्वीन्स पार्क ओव्हलमध्ये खेळला जाईल. या स्पर्धेचे प्रक्षेपण डीडी स्पोर्ट्सवर होईल. तसेच, लाईव्ह स्ट्रीमिंग जिओ सिनेमा आणि फॅनकोड ऍपवर होईल. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या दृष्टीने ही मालिका दोन्ही संघांसाठी खूपच महत्त्वाची आहे.
कसोटी पदार्पण
भारतीय संघ वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेसोबत आपल्या जागतिक कसोटी अजिंक्यपद 2023-25 सायकलची सुरुवात करत आहे. या मालिकेसाठी सुरुवातीपासूनच काही खेळाडूंना कसोटीत महत्त्वपूर्ण प्रदर्शन करण्याची संधीही मिळाली आहे. तसेच, काही नवीन खेळाडूंचीही एन्ट्री झाली आहे, जे भारतासाठी आपला पहिलाच सामना खेळण्यासाठी सज्ज आहेत.
विराट बनला वरिष्ठ खेळाडू
विराट कोहली (Virat Kohli) आणि राहुल द्रविड (Rahul Dravid) ही जोडगोळी 12 वर्षांनंतर कसोटी क्रिकेटसाठी या मैदानावर परतले आहेत. मात्र, यावेळी त्यांच्या भूमिका वेगळ्या आहेत. विराट वरिष्ठ खेळाडू आहे, तर राहुल द्रविड मुख्य प्रशिक्षकाच्या भूमिकेत आहे. मागील वेळी जेव्हा संघ विंडीज दौऱ्यावर आला होता, तेव्हा भारताने मालिका 2-0ने जिंकली होती. त्यांनी 2011मध्ये या मैदानावर फक्त एक कसोटी सामना खेळला होता.
सन 2011मध्ये भारताची कसोटी मालिका
भारतीय संघाकडे तिसऱ्या सामन्यात 1-0ने आघाडीवर होता. एमएस धोनी (MS Dhoni) याने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. वेस्ट इंडिजने पहिल्या डावात यष्टीरक्षक कार्लटन बॉघ आणि डॅरेन ब्रावो यांच्या अर्धशतकांच्या मदतीने 204 धावांचा पाऊस पाडला होता. यावेळी ईशांत शर्मा सर्वोत्तम गोलंदाज ठरला होता. त्याने 22.3 षटकात 77 धावा खर्चून 5 विकेट्स घेतल्या होत्या.
भारताचा डाव
धोनीच्या नेतृत्वातील भारतीय संघाने चांगली कामगिरी करत पहिल्या डावात 347 धावा केल्या होत्या. यामध्ये अभिवन मुकुंद (62), व्हीव्हीएस लक्ष्मण (56), सुरेश रैना (50) आणि एमएस धोनी (74) या खेळाडूंनी मोलाचे योगदान दिले होते. यावेळी फिदेल एडवर्ड्स याने यजमान संघाकडून सर्वात खतरनाक गोलंदाजी करत 103 धावांच्या मोबदल्यात 5 विकेट्स घेतल्या होत्या. तसेच, डॅरेन सॅमी आणि देवेंद्र बिशू यांनी प्रत्येक 2 विकेट्स घेतल्या होत्या.
अनिर्णित राहिलेला सामना
अशात यजमान संघावर घरच्या मैदानावर मालिका न गमावण्याचा दबाव होता. हरभजन सिंग याने शानदार गोलंदाजी करत 4 विकेट्स घेतल्या. भारताने 180 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना 32 षटकांमध्ये 3 बाद 94 धावा केल्या होत्या. मात्र, अखेरच्या 15 षटकात 86 धावांची गरज होती. तसेच, 7 विकेट्स हातात होत्या. अशात दोन्ही संघांनी हातमिळवणी केली आणि दोघांच्या संमतीने सामना अनिर्णित घोषित करण्यात आला. यानंतर सामना अनिर्णित करण्याच्या निर्णयाबद्दल अनेक क्रिकेटपटू तसेच चाहत्यांनी धोनीवर टीकास्त्र डागले होते. मात्र, धोनीनेही यावर स्पष्टीकरण दिले होते. (wi vs india last match in dominica result former cricketer ms dhoni criticised for decision)
महत्वाच्या बातम्या-
निर्णायक चौथ्या कसोटीच्या आठवडाभरापूर्वीच इंग्लंडचा संघ जाहीर, खराब फॉर्मातील खेळाडूवर दाखवला विश्वास
पत्नी साक्षीच्या ‘त्या’ वक्तव्यावर धोनीचे स्पष्टीकरण; म्हणाला, ‘मी पत्नीला तमिळ भाषेतील घाणेरडे शब्द…’