दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडीज या दोन्ही संघांनी कसोटी मालिकेद्वारे आपल्या नवीन क्रिकेट हंगामाची सुरुवात केली आहे. ग्रॉस आयलेट येथील डॅरेन सॅमी आंतरराष्ट्रीय मैदानावर सुरू झालेल्या या सामन्यावर पहिल्या दिवशी दक्षिण आफ्रिकेने मजबूत पकड मिळवली. वेगवान गोलंदाजांच्या अफलातून कामगिरीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने वेस्ट इंडीजला शंभरी देखील गाठू दिली नाही. दिवसाखेर ४ बाद १२८ धावा उभारून दक्षिण आफ्रिकेने ठीकठाक सुरुवात केली आहे.
वेस्ट इंडीजचे पानिपत
वेस्ट इंडिजचा कर्णधार क्रेग ब्रेथवेट इयत्ता नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय चांगलाच अंगाशी आला. दक्षिण आफ्रिकेचा उभरता वेगवान गोलंदाज एन्रिक नॉर्कीएने सुरुवातीला ८ धावांमध्ये तीन फलंदाज तंबूत धाडले. बिनबाद २४ या धावसंख्येवरून वेस्ट इंडिजचा डाव सर्वबाद ९७ असा गुंडाळला गेला. दक्षिण आफ्रिकेचा डाव संपुष्टात आणण्यामध्ये वेगवान गोलंदाज लुंगी एन्गिडीचे सर्वात मोठे योगदान राहिले. त्याने अवघ्या १९ धावा देत पाच बळी आपल्या नावे केले. नॉर्कीएने चार तर, अनुभवी कगिसो रबाडाने एक बळी टिपला.
एन्गिडीने कारकीर्दीत केवळ दुसऱ्यांदा पाच गडी बाद करण्याची किमया केली आहे. यापूर्वी त्याने अशी कामगिरी आपल्या पदार्पणाच्या कसोटीत भारताविरुद्ध केली होती.
वेस्ट इंडीजला बसला मोठा धक्का
पहिल्या डावादरम्यान वेस्ट इंडिजला एक मोठा धक्का बसला. बांगलादेश विरुद्ध मालिका विजय मिळवून देण्यात सिंहाचा वाटा उचलणारा न्कुमराह बॉनर हा डोक्यावर चेंडू लागल्याने सामन्यातून बाहेर पडला. कगिसो रबाडाचा एक वेगवान बाउन्सर त्याच्या डोक्यावर आदळला. त्याला कन्कशनचा त्रास जाणवू लागल्याने त्याचा बदली खेळाडू म्हणून उर्वरित सामन्यात २०१८ नंतर वेस्टइंडीज संघात पुनरागमन करणाऱ्या कायरन पॉवेलला संधी देण्यात आली आहे.
दक्षिण आफ्रिकेची सावध सुरुवात
वेस्ट इंडिजला ९७ धावांवर सर्व बाद केल्यानंतर दक्षिण आफ्रिकेचे सुरुवात देखील चांगली झाली नाही. कर्णधार डीन एल्गर खातेही न खोलता माघारी परतला. युवा किगन पीटरसनने १९ धावा बनविल्या. मात्र, ऐडेन मार्करमने अप्रतिम अर्धशतकी खेळी करून दक्षिण आफ्रिकेला अडचणीतून बाहेर काढले. दिवसाचा खेळ संपला तेव्हा यष्टीरक्षक क्विंटन डी कॉक ४ व रॅसी वॅन डर डसेन ३४ धावांवर खेळत होते. वेस्ट इंडीजसाठी पदार्पण करणाऱ्या जेडेन सेअल्सने तीन बळी मिळवले.
महत्त्वाच्या बातम्या –
‘यॉर्कर किंग’ जसप्रीत बुमराह आहे कोट्यावधी रुपयांचा मालक, कमाई पाहून व्हाल थक्क
अरेरे! फ्लिंटॉफच्या ‘त्या’ वक्तव्याची शिक्षा मिळाली होती ब्रॉडला; युवराजने ठोकले होते सलग ६ षटकार