2024 महिला टी20 विश्वचषकात भारतीय संघानं पाकिस्तानविरुद्ध शानदार सुरुवात केली. नाणेफेक हरल्यानंतर प्रथम गोलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरलेल्या टीम इंडियानं अप्रतिम खेळ दाखवला. भारतीय गोलंदाजांनी पहिल्याच षटकापासून पाकिस्तानवर पकड घट्ट केली. टीम इंडियानं पाकिस्तानला एकापाठोपाठ एक धक्के दिले, त्यामुळे त्यांचा डाव गडबडला.
भारतीय खेळाडूंनी या सामन्यात क्षेत्ररक्षणातही आपलं कौशल्य दाखवलं. या सामन्यात भारताची यष्टीरक्षक रिचा घोष हिनं पाकिस्तानची कर्णधार फातिमा सनाचा अप्रतिम झेल घेतला. रिचानं हा झेल जवळजवळ पहिल्या स्लिपपर्यंत झेप घेऊन पकडला. तिच्या या कॅचनं चाहत्यांना दिग्गज यष्टीरक्षक महेंद्रसिंह धोनीची आठवण आली.
वास्तविक, आशा शोभनाच्या चेंडूवर पाकिस्तानी कर्णधार फातिमा थर्ड मॅनच्या दिशेनं धाव चोरण्याचा प्रयत्न करत होती. परंतु रिचाच्या चपळाईसमोर तिची हुशारी कामी आली नाही. रिचानं विकेट मागे तिचा जबरदस्त झेल घेतला. या झेलचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तुम्ही हा व्हिडिओ येथे पाहू शकता.
A STUNNER FROM RICHA GHOSH. 🥶 pic.twitter.com/PJxWJ2O4KP
— Johns. (@CricCrazyJohns) October 6, 2024
भारताविरुद्धच्या सामन्यात पाकिस्तान संघानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र हा निर्णय त्यांना महागात पडला. भारतीय संघाच्या गोलंदाजीसमोर पाकिस्तानची अवस्था खूपच वाईट झाली. टीम इंडियाच्या गोलंदाजांनी पाकिस्तानच्या फलंदाजांना क्रीजवर टिकण्याची संधीही दिली नाही. पाकिस्तानी संघाला निर्धारित 20 षटकांच्या सामन्यात 8 विकेट गमावून 105 धावाच करता आल्या.
पाकिस्तानकडून निदा दारनं सर्वाधिक 28 धावा केल्या. याखेरीज इतर कोणत्याही खेळाडूला फलंदाजीत आपलं कर्तृत्व दाखवता आलं नाही. गोलंदाजीबद्दल बोलायचं झालं तर, टीम इंडियाकडून अरुंधती रेड्डीनं तीन विकेट घेतल्या. याशिवाय श्रेयंका पाटीलनं दोन तर रेणुका सिंग ठाकूर, दीप्ती शर्मा आणि आशा शोभना यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
हेही वाचा –
“संजू सॅमसनमुळे मला पुन्हा संधी मिळाली”, आयपीएलमध्ये कहर करणाऱ्या खेळाडूचा मोठा खुलासा
विश्वचषकाच्या पहिल्याच सामन्यात दुखापत, पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यातून बाहेर मोठी खेळाडू!
धोनी की रोहित, चांगला कर्णधार कोण? अवघड प्रश्नावर वर्ल्ड कप विजेता गोंधळला!