आयपीएलचा 18वा हंगाम जवळजवळ संपला आहे. दरम्यान आज (19 एप्रिल) गुजरात टायटन्स आणि दिल्ली कॅपिटल्स (GT vs DC) हे संघ आमन-सामने आले. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकात 8 गडी गमावून 203 धावा केल्या. या सामन्यात गुजरात टायटन्सकडून प्रसिद्ध कृष्णाने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. दरम्यान या सामन्यात प्रसिद्धच्या चेंडूवर जोस बटलरने (Jos Buttler) विकेटच्या मागे एक शानदार कॅच घेतला, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
18व्या षटकात गोलंदाजी करण्यासाठी आलेल्या प्रसिद्ध कृष्णाने पहिल्याच चेंडूवर अक्षर पटेलची (Axar Patel) विकेट घेतली. अक्षर पटेलचा झेल जोस बटलरने विकेटमागे घेतला. पुढच्याच चेंडूवर प्रसिद्ध कृष्णाने फलंदाज विपराज निगमला बाद केले, विकेटच्या मागे, जोस बटलरने चेंडू पकडण्यासाठी उजवीकडे डाईव्ह केला आणि हवेत उडत झेल घेतला.
A screamer out of nowhere 🔥
— IndianPremierLeague (@IPL) April 19, 2025
🎥 Jos Buttler's one-handed grab gives Prasidh Krishna his well deserved 4th wicket 💙
Updates ▶️ https://t.co/skzhhRWvEt#TATAIPL | #GTvDC | @gujarat_titans pic.twitter.com/AKL5P4PRIm
विपराज निगमने ऑफ स्टंपच्या बाहेर थर्ड मॅनकडे एक उत्तम चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला, चेंडू विकेटकीपरच्या जवळून वेगाने जात होता, पण जोस बटलरने उत्कृष्ट डाईव्ह करून जबरदस्त झेल घेतला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने गुजरात टायटन्ससमोर विजयासाठी 204 धावांचे लक्ष्य ठेवले. दिल्ली कॅपिटल्सकडून अक्षर पटेलने 39 धावा (32 चेंडू), आशुतोष शर्माने 37 धावा (19 चेंडू), करुण नायरने 31 धावा (18 चेंडू) आणि ट्रिस्टन स्टब्सने 31 धावा (21 चेंडू) केल्या. केएल राहुलने 14 चेंडूत 28 धावांची खेळी केली.