सोमवारी (13 फेब्रुवारी) वुमेन्स प्रिमियर लीगच्या पहिल्या हंगामासाठी मुंबईत बीसीसीआयने खेळाडूंचा लिलाव आयोजित केला. यामध्ये भारत आणि विदेशातीक अनेक महिला खेळाडूंवर पैशाचा अक्षरशः पाऊस पडला. भारतीय संघाची यष्टीरक्षक यास्तिका भाटिया हिला अनपेक्षितपणे मोठी मागणी मिळाली. मुंबई इंडियन्सने तिच्यावर दीड कोटी रुपयांची बोली लावत तिला आपल्या संघाचा भाग बनवले.
Yastika Bhatia ka #OneFamily mein swagat 💙
The talented batter & an absolute gun fielder joins our ranks and we can't keep calm! 😍#OneFamily #MumbaiIndians #AaliRe #WPLAuction pic.twitter.com/sz4Lgq47fT
— Mumbai Indians (@mipaltan) February 13, 2023
डाव्या हाताची आक्रमक फलंदाज व यष्टीरक्षक असलेली यास्तिका सध्या टी20 विश्वचषकात भारतीय संघासाठी खेळताना दिसत आहे. पाकिस्तान विरुद्ध झालेल्या पहिल्या सामन्यात तिने स्मृती मंधानाच्या जागी मिळालेल्या संधीचे सोने करत भारताला आक्रमक सुरुवात दिली होती. तसेच ती एक उत्कृष्ट यष्टीरक्षक असल्याने मुंबई इंडियन्सला तिचा दुहेरी फायदा होताना दिसेल. तिला आपल्या संघात सामील करून घेण्यासाठी यूपी वॉरियर्स संघाने देखील मोठा प्रयत्न केला. मात्र, अखेरीस मुंबईला तिला आपल्याकडे खेचण्यात यश लाभले.
मुंबईने या लिलावात उत्कृष्ट कामगिरी बजावली. भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौर, इंग्लंडची दिग्गज नतालिया सिवर, न्यूझीलंडची अनुभवी अमेलिया कर व भारताची अष्टपैलू पूजा वस्त्राकार यांना देखील मुंबईसाठी खेळण्याची संधी मिळणार आहे.
(Wicketkeeper Yastika Bhatia Bought By Mumbai Indians In WPL)