यंदाची आयसीसी चॅम्पियन्स ट्राॅफी (ICC Champions Trophy 2025) सुरू होण्यासाठी काही आठवडे शिल्लक आहेत. जगातील सर्व सर्वोत्तम क्रिकेट संघ आणि क्रिकेटप्रेमी त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. चॅम्पियन्स ट्रॉफीतील पहिला सामना (19 फेब्रुवारी) रोजी पाकिस्तान-न्यूझीलंड संघात रंगणार आहे. तर भारतीय संघ आपल्या मोहिमेची सुरूवात (20 फेब्रुवारी) रोजी दुबईमध्ये बांगलादेशविरूद्ध करणार आहे, ज्यासाठी भारतीय नियामक मंडळाने (BCCI) (18 जानेवारी) रोजी 15 सदस्यीय भारतीय संघाची घोषणा केली.
भारताच्या 15 सदस्यीय संघात 2 यष्टीरक्षक आहेत. त्यामध्ये केएल राहुल (KL Rahul) रिषभ पंत (Rishabh Pant) यांचा समावेश आहे. दोन्ही खेळाडू त्यांच्या फलंदाजी आणि यष्टीमध्ये संघात खूप महत्त्वाची भूमिका बजावतात. फलंदाजीसोबतच त्यांची यष्टीची आकडेवारीही उत्कृष्ट आहे.
अशा परिस्थितीत, 2025च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये यष्टीरक्षकाची संधी कोणाला मिळते? हे पाहणे महत्वाचे ठरेल. तत्पूर्वी या बातमीद्वारे आपण दोन्ही यष्टीरक्षकांच्या यष्टीरक्षकाची आकडेवारी जाणून घेऊया.
केएल राहुल, रिषभ पंत यांच्या यष्टीरक्षकाची आकडेवारी- केएल राहुलने (KL Rahul) 77 वनडे सामन्यांत 68 वेळा फलंदाजांना बाद केले आहे. यष्टीरक्षक म्हणून त्याने 52 झेल घेतले आहेत. त्याने 5 स्टंपिंगही केले आहेत. क्षेत्ररक्षक म्हणून, केएल राहुलने 11 झेल घेतले आहेत. रिषभ पंतने (Rishabh Pant) 31 वनडे सामन्यांत 28 वेळा फलंदाजांना बाद केले आहे. यष्टीरक्षक म्हणून त्याने 23 झेल घेतले आहेत. दरम्यान त्याने 1 स्टंपिंग केले आहे. क्षेत्ररक्षक म्हणून, पंतने 4 झेल घेतले आहेत.
केएल राहुल, रिषभ पंत फलंदाजीची आकडेवारी- केएल राहुलने (KL Rahul) 77 वनडे सामन्यांत 49.15च्या सरासरीने 2,851 धावा केल्या आहेत. दरम्यान त्याने 7 शतकांसह 18 अर्धशतके झळकावली आहेत. रिषभ पंतने (Rishabh Pant) 31 वनडे सामन्यांत 33.50च्या सरासरीने 871 धावा केल्या आहेत. दरम्यान त्याने 1 शतक, 5 अर्धशतके झळकावली आहेत.
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी भारतीय संघ- रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, यशस्वी जयस्वाल, रिषभ पंत, रवींद्र जडेजा
महत्त्वाच्या बातम्या-
भारत-इंग्लंड पहिल्या टी20 सामन्यादरम्यान कसे असणार हवामान?
स्वप्नवत कामगिरी! पदार्पणात हॅट्ट्रीक घेत 19 वर्षीय खेळाडूनं रचला इतिहास, भारताचा सहज विजय
याला म्हणतात ‘गंभीर’ परिणाम, विराट कोहली 12 तर रोहित शर्मा 10 वर्षांनी रणजी ट्रॉफी खेळणार