भारताचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत (Rishabh Pant) सध्या वाईट काळातून जात आहे. काही दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलियाविरुद्ध (Australia) पार पडलेल्या वनडे मालिकेच्या पहिल्या सामन्यात त्याला दुखापत (Injured) झाल्यामुळे त्याला संघातून बाहेर बसावे लागले आहे.
त्याचा बदली यष्टीरक्षक म्हणून ऑस्ट्रेलिया विरुद्ध वनडे मालिकेत केएल राहुलने जबाबदारी पार पाडली. त्याने ही जबाबदारी पार पाडताना चांगली कामगिरी करत धावाही केल्या. त्यामुळे सध्या सुरु असलेल्या न्यूझीलंडविरुद्ध (New Zealand) आंतरराष्ट्रीय टी20 मालिकेतील पहिल्या 2 सामन्यांसाठी पंत उपलब्ध असतानाही केएल राहुलला (KL Rahul) संधी देण्यात आली आहे.
त्यामुळे आता पंत भारतीय संघात पुनरागमन करून स्वत:ला सिद्ध करू शकेल का?, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
पण यावर ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज कर्णधार आणि आयपीएलमधील दिल्ली कॅपिटल्स संघाचा मुख्य प्रशिक्षक रिकी पाँटिंगने (Ricky Ponting) आयपीएल सुरु होण्यापूर्वी पंत भारतीय संघात पुनरागमन करेल, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
पाँटिंगला ट्विटरवर एका चाहत्याने विचारले की पंतबद्दल काय वाटते. त्याला क्रिकेटच्या तिन्ही प्रकारातील संघातून स्थान गमवावे लागले आहे.
यावर पाँटिंगने उत्तर देताना म्हटले की, “पंत एक युवा खेळाडू आहे. त्यामध्ये भरपूर प्रतिभा आहे. मला येत्या आयपीएलच्या मोसमात पुन्हा पंतसोबत काम करण्याची अपेक्षा आहे. तसेच मला खात्री आहे की तो लवकरात लवकर भारतीय संघात पुनरागमन करेल.”
22 वर्षीय पंतने आतापर्यंत 11 कसोटी, 16 वनडे, 28 आंतरराष्ट्रीय टी20 आणि 54 आयपीएल सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने कसोटीत 754 धावा, वनडेत 374धावा , टी20मध्ये 410 आणि आयपीएलमध्ये 1736 धावा केल्या आहेत.
बापरे! पदार्पणाच्या पहिल्याच षटकात या क्रिकेटपटूने घेतली हॅट्रिक
वाचा👉https://t.co/7b8GRCSPta👈#म #मराठी #Cricket #RanjiTrophy— Maha Sports (@Maha_Sports) January 27, 2020
रोहित-विराटकडून ही खास गोष्ट शिकला श्रेयस अय्यर
वाचा👉https://t.co/0M8hloEVAu👈#म #मराठी #Cricket #TeamIndia #INDvsNZ @ShreyasIyer15— Maha Sports (@Maha_Sports) January 27, 2020