पुणे । एचएसबीसी, मास्टरकार्ड संघांनी चॅम्पियन्स ट्रॉफी टी-२० क्रिकेट स्पर्धेत आपापल्या प्रतिस्पर्ध्यावर मात केली.
पिंपरी-चिंचवडच्या टेल्को मैदानावर झालेल्या पहिल्या लढतीत एचएसबीसी संघाने आयरिसर्च संघावर ३० धावांनी मात केली. एचएसबीसी संघाने प्रथम फलंदाजी करताना ६ बाद १६६ धावा केल्या. यात गणेश मिसाळने २१ चेंडूंत ३९, तर शशांक सोलंकीने २७ चेंडूंत नाबाद ३८ धावांची खेळी केली. यानंतर लक्ष्याचा पाठलाग करताना आयरिसर्च संघाला ७ बाद १३६ धावाच करता आल्या.
यानंतर झालेल्या दुस-या लढतीत मास्टरकार्ड संघाने एलटीआय पुणे संघावर सात धावांनी मात केली. मास्टरकार्ड संघाने प्रथम फलंदाजी करताना ६ बाद १२७ धावा केल्या. यानंतर एलटीआय पुणे संघाला ८ बाद १२० धावांत रोखले. एलटीआय पुणेच्या डिंकू मालवियाची अष्टपैलू कामगिरी व्यर्थ ठरली.
संक्षिप्त धावफलक –
१) एचएसबीसी – २० षटकांत ६ बाद १६६ (गणेश मिसाळ ३९, शशांक सोलंकी नाबाद ३८, संजय लोखंडे २६, शक्तीसिंग ३-१६, जॉय भट्टाचार्य २-३३) वि. वि. आयरिसर्च – २० षटकांत ७ बाद १३६ (शक्तीसिंग ४०, हृषीकेश साळुंके ३५, धीरज कस्ताला २७, संजयकुमार लोखंडे ३-३०, एजाज शुजा २-२१). सामनावीर- संजय लोखंडे
२) मास्टरकार्ड – २० षटकांत ६ बाद १२७ (इमाम जाफर ३४, मंदार नायर २८, अभिजित परिदा २३, प्रत्युष साहू नाबाद २०, डिंकू मालविया ३-१४) वि. वि. एलटीआय पुणे – २० षटकांत ८ बाद १२० (डिंकू मालविया नाबाद ४४, साहिल के. ३२, सौरभ नेवासे ३-२३, अमित भगत २-२४). सामनावीर- सौरभ नेवासे