---Advertisement---

MI vs LSG: ‘हा’ ठरला मुंबईच्या विजयाचा टर्निंग पाॅईंट!

---Advertisement---

यंदाच्या आयपीएल हंगामातील (IPL 2025) 45वा सामना आज (27 एप्रिल) मुंबई इंडियन्स विरूद्ध लखनऊ सुपर जायंट्स संघात खेळला गेला. या सामन्यात हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सने 54 धावांनी दणदणीत विजय मिळवला. या विजयासहित मुंबईचा संघ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी पोहोचला आहे.

लखनऊने टाॅस जिंकून मुंबईला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केलं होतं. प्रत्युत्तरात मुंबई इंडियन्सने प्रथम खेळल्यानंतर 20 षटकांत 215 धावा केल्या. प्रत्युत्तरात, लखनऊचा संघ फक्त 161 धावा करू शकला. 206 धावांचा पाठलाग करताना लखनऊची सुरुवात चांगली झाली नाही. एडेन मार्कराम फक्त 9 धावा करू शकला. त्यानंतर मिचेल मार्श आणि निकोलस पूरन यांनी जलद धावा केल्या.

मिशेल मार्श 24 चेंडूत 34 धावा काढून बाद झाला. तर विस्फोटक फलंदाज निकोलस पूरन फलंदाजी करताना चांगल्याच फाॅर्मात दिसत होता. त्याने वेगवान गोलंदाज दीपक चहरला सलग 3 षटकार देखील ठोकले होते. त्याने रौद्र रूप धारण केले असतानाच मुंबईचा फिरकी गोलंदाज विल जॅक्सने त्याला सूर्यकुमार यादवच्या हातात झेलबाद केले. पूरन जर मोठी खेळी करण्यात यशस्वी झाला असता तर मुंबईला सामना जिंकणे कदाचित कठीण गेले असते. पूरनची विकेट हा या सामन्याचा टर्निंग पाॅईंट ठरला. पूरन 15 चेंडूत 27 धावा काढून पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याने आपल्या खेळीत 1 चौकार आणि 3 खणखणीत षटकार ठोकले.

मुंबईकडून सूर्यकुमार यादवने 28 चेंडूत 54 धावा आणि रायन रिकेल्टनने 32 चेंडूत 58 धावा केल्या. शेवटी, नमन धीर 11 चेंडूत 25 धावा काढून नाबाद परतला. पदार्पण करणाऱ्या कॉर्बिन बॉशने 10 चेंडूत 20 धावा केल्या. तर विल जॅक्सने 29 धावा केल्या. या सामन्याचा सामनावीर पुरस्कार निकोलस पूरनची विकेट घेतलेल्या विल जॅक्सला देण्यात आला.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---