इंग्लंडचा 24 वर्षीय फलंदाज विल जॅक्स याने मायदेशातील व्हिटॅलिटी ब्लास्टमध्ये धमाका केला. सरे आणि मिडलसेक्स संघात गुरुवारी (22 जून) आमना सामना झाला. या सामन्यात सरेने जॅक्सच्या वादळी खेळीच्या जोरावर 252 धावा केल्या होत्या. मात्र, मिडलसेक्सच्या फलंदाजांनीही धावांचा अक्षरशः पाऊश पाडला आणि सामना जिंकला. जॅक्सने या सामन्यात सलग पाच षटकार मारले.
उभय संघांतील हा सामना इंग्लंडच्या द ओव्हल स्टेडियमवर खेळला गेला. मिडलसेक्स संघाने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीसाठी सरे संघाला आमंत्रित केले. विल जॅक्स (Will Jacks) प्रतिनिधित्व करत असलेल्या सरे संघाने 20 षटकांमध्ये 252 धावा उभ्या केल्या. यात जॅक्सचने वैयक्तिक 45 चेंडूत 96 धावंचे योगदान होते. सरेच्या डावातील 11 व्या षटकात ल्यूक हॉलमन () गोलंदाजीला आला होता. या षटकातील अगदी पहिल्या चेंडूपासूनच विल जॅक्सने षटकार मारायला सुरुवात केली. पहिल्याच पाच चेंडूवर पाच षटकार मारल्यानंतर शेवटचा चेंडू मात्र त्याला व्यवस्थित खेळता आला नाही. मिडलसेक्सच्या या फिरकी गोलंदाजाने शेवटचा चेंडू फुलटॉस टाकल्यामुळे जॅक्सला त्याचा अंदाज घेता आला नाही.
विल जॅक्स आयपीएल 2023मध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचा भाग होता. मात्र, दुखापतीमुळे तो खेळू शकला नाही. अवघा एक षटकार मकी पडल्यामुळे विल जॅक्स युवराज सिंग, हर्शल गिब्ज आणि कायरन पोलार्ड यांच्या यादीत सामील होऊ शकला नाही. अनेकांनी त्याची तुलना आयपीएलमध्ये रिंकू सिंगने मारलेल्या पाच षटकांसोबत केली. रिंकून कोलकाता नाईट रायडर्स संघासाठी खेळताना गुजरात टायटन्सविरुद्ध शेवटच्या पाच चेंडूंवर पाच षटकार मारले आणि संघाला विजय मिळवून दिला होता. विल जॅक्सच्या या षटकारांचा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.
Exceptional batting from Will Jacks 👏
He hits 31 from the over, just missing out on six sixes 😲#Blast23 pic.twitter.com/RVrsw20clo
— Vitality Blast (@VitalityBlast) June 22, 2023
उभय संघांतील या सामन्याचा एकंदरीत विचार केला, तर मिडलसेक्सला विजयासाठी 253 धावांचे लक्ष्य मिळाले होते, जे त्यांनी चार चेंडू आणि 7 विकेट्स राखून गाठले. त्यांचा सलामीवीर स्टीफन इस्टिनाजी आणि जो क्रॅकनेल यांनी 6.1 षटकांमध्येच 90 धावा कुटल्या. इस्किनाजीने 39 चेंडूत 73 धावा केल्या. मॅक्स होल्डर आणि रायन हिगिन्स यायंनीही तिसऱ्या विकेटसाठी 105 धावांची भागीदारी केली. होल्डने 68, तर हिगिन्सने 48 धावा केल्या. तत्पूर्वी सरेसाठी विल जॅक्सला लॉरी इव्हान्स (37 चेंडूत 85 धावा) याची चांगली साथ मिळाली होती.
महत्वाच्या बातम्या –
बरोबर 16 वर्षांपुर्वी क्रिकेटमध्ये सुरू झालेले हिटमॅन पर्व! येत्या काळात भारतासाठी करणार ‘ही’ मोठी कामगिरी
होप-पूरनने दाखवली कॅरेबियन पॉवर! वर्ल्डकप क्वालिफायर्समध्ये नोंदवला सलग दुसरा विजय