---Advertisement---

चहल यंदा दिसणार मुंबई इंडियन्सकडून खेळताना? रोहितबरोबरच्या त्या व्हिडिओनंतर चर्चांना उधान

Rohit-Sharma-Yuzvendra-Chahal
---Advertisement---

भारत आणि वेस्ट इंडिज संघात सध्या अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर ३ सामन्यांची वनडे मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील पहिला सामना भारतीय संघाने ६ विकेट्सने जिंकून मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. भारताच्या या विजयात फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) आणि कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) यांनी मोलाचा वाटा उचलला. तसेच या सामन्याचा सामनावीर पुरस्कारही चहलला देण्यात आला. या सामन्यानंतर चहल आणि रोहित यांच्यातील संभाषणाचा एक व्हिडिओ बीसीसीआयने शेअर केला आहे, ज्यात हे दोघे आयपीएल लिलावाबद्दल बोलताना दिसून आले. 

आयपीएलमध्ये रोहित शर्मा मुंबई इंडियन्सकडून खेळतो, तसेच या संघाचा कर्णधारही आहे, तर चहल गेली अनेक वर्षे रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा भाग होता. पण, आता त्याला आयपीएल २०२२ च्या लिलावापूर्वी आरसीबीने त्याला संघातून मुक्त केले. त्यामुळे चहल आयपीएल २०२२ लिलावात उतरणार आहे. १२ आणि १३ फेब्रुवारी रोजी आयपीएल २०२२ हंगामाचा लिलाव (IPL 2022 Auction) होणार आहे.

मुंबई इंडियन्स लावणार चहलवर बोली?
पहिल्या वनडेनंतर बीसीसीआयने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये रोहित आणि चहल सामन्यातील कामगिरीबद्दल चर्चा करतात. तसेच रोहितने चहलला १०० वनडे विकेट्स पूर्ण केल्याबद्दल अभिनंदन देखील केले. तसेच, व्हिडिओच्या शेवटी रोहितने चहलला आयपीएल लिलावासाठीदेखील शुभेच्छा दिल्या, ज्यानंतर हे दोन्ही खेळाडू एकमेकांकडे पाहून जोरजोरात हसताना दिसले.

त्यांचा हा व्हिडिओ पाहून चाहत्यांनी असा कयास लावायला सुरुवात केली की, यंदाच्या आयपीएल लिलावात मुंबई इंडियन्स संघ (Mumbai Indians) चहलवर बोली लावू शकतील. तसेच आत्तापर्यंत रोहित आणि चहल यांच्या चांगले मैत्रीचे नातेही दिसून आले आहे. त्याचमुळे चाहत्यांनी चहल मुंबई इंडियन्स संघात सामील होऊ शकतो, अशी शक्यता व्यक्त केली आहे.

विशेष म्हणजे २०११ मध्ये मुंबई इंडियन्स संघाकडून चॅम्पियन्स लीगमध्ये एक सामना खेळला होता.

चहल गेल्या काही वर्षांपासून आरसीबी संघाचा महत्त्वाचा भाग राहिला होता. त्याने आरसीबीकडून खेळताना ११३ सामन्यांत १३९ विकेट्स काढल्या आहेत. तसेच तो आरसीबीकडून १०० हून अधिक विकेट्स घेणारा पहिला आणि सध्यातरी एकमेव गोलंदाज आहे.

https://twitter.com/IAMSIDHANT/status/1490621081983410176

चहलची वेस्ट इंडिजविरुद्ध शानदार कामगिरी
चहलने वेस्ट इंडिजविरुद्ध पहिल्या वनडेत शानदार कामगिरी करताना ९.५ षटकात ४९ धावांत ४ विकेट्स घेतल्या. त्याने निकोलस पूरन, कायरन पोलार्ड, शमराह ब्रुक्स आणि अल्झारी जोसेफ या वेस्ट इंडिजच्या खेळाडूंच्या विकेट्स घेतल्या. याबरोबरच त्याने वनडेमध्ये १०० विकेट्स घेण्याचा टप्पाही पार केला.

या सामन्यात वेस्ट इंडिजला प्रथम फलंदाजी करताना ४३.५ षटकात सर्वबाद १७६ धावा करता आल्या होत्या. त्यानंतर १७७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग भारतीय संघाने रोहितच्या ६० धावांच्या खेळीच्या जोरावर २८ षटकांतच पूर्ण केला.

महत्त्वाच्या बातम्या – 

विश्वविजेत्या युवा टीम इंडियाला शुभेच्छा देताना शाहीद कपूरकडून ‘गलती से मिस्टेक’, सोशल मीडियावर जोरदार ट्रोल

‘संघ व्यवस्थापनाला युवा अष्टपैलूंवर विश्वास नाही’; दिग्गजाचा सनसनाटी आरोप

कर्णधाराचा प्रश्न सोडवण्यासाठी माजी भारतीय क्रिकेटपटूने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाला दिला मोलाचा सल्ला

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---