---Advertisement---

DC vs RCB: दिल्लीतील सामन्यावर पावसाचे सावट? जाणून घ्या हवामानाचा सविस्तर अंदाज

---Advertisement---

आयपीएल 2025 मध्ये 46 वा सामना आज म्हणजेच रविवार (27 एप्रिल) रोजी दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु (DC vs RCB) संघामध्ये खेळला जाणार आहे. हा सामना दिल्लीच्या घरेलू मैदानावर होणार आहे. या हंगामातील दिल्लीचा आरसीबी विरुद्ध हा दुसरा सामना आहे. पहिल्या सामन्यात दिल्लीने आरसीबीचा शानदार पराभव करत 6 विकेट्सने विजय मिळवला होता. त्यामुळेच आता रजत पाटीदारच्या (Rajat Patidar) नेतृत्वाखाली आरसीबी अरुण जेटली स्टेडियमवर दिल्लीकडून त्यांच्या पराभवाचा बदला घेण्याचा पूर्ण प्रयत्न करेल.

दिल्लीने 8 सामन्यांमध्ये 6 सामन्यात विजय मिळवला आहे, तसेच आरसीबीने सुद्धा 9 सामन्यांमध्ये 6 सामने जिंकले आहेत. त्यांचे सध्या 12 गुण आहेत आणि ते पॉईंट्स टेबलवर तिसऱ्या स्थानावर आहेत. बंगळुरूची टीम चांगल्या फॉर्ममध्ये आहे, त्यामुळे चाहत्यांना विराट कोहलीकडून शानदार खेळीची अपेक्षा असेल.

दिल्ली कॅपिटल्स आणि आरसीबीमध्ये होणाऱ्या सामन्यादरम्यान पावसाची कोणतीही शक्यता नाही. सामन्यादरम्यान हवामान साफ राहण्याची शक्यता आहे. त्यामुळेच चाहत्यांना 40 षटकांचा रोमांचक सामना अडथळ्याशिवाय पाहायला मिळू शकतो. तसेच खेळाडूंसोबत चाहत्यांना सुद्धा गरम हवामानाने त्रास होऊ शकतो. सामन्यादरम्यान तापमान 38 ते 40 डिग्री सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे.

अरुण जेटली क्रिकेट स्टेडियमची खेळपट्टी फलंदाजांसाठी अतिशय फायदेशीर मानली जाते. या मैदानावर षटकार- चौकारांचा पाऊस पाहायला मिळतो. तसेच मैदानाची बाउंड्री लहान असल्याने फलंदाजांना चेंडू बाउंड्रीच्या पलीकडे पोहोचवण्यासाठी जास्त मेहनत घ्यावी लागत नाही. दिल्लीच्या घरेलू मैदानावर आत्तापर्यंत 91 आयपीएल सामने खेळले गेले आहेत. यामध्ये प्रथम फलंदाजी करणारा संघ 44 वेळा विजयी झाला आहे, तसेच 46 वेळा धावांचा पाठलाग करणारा संघ विजयी झाला आहे. या मैदानावरील सर्वात मोठी धावसंख्या 266 धावांची आहे, जी सनरायझर्स हैदराबादने दिल्ली विरुद्ध केली होती.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---