---Advertisement---

मुंबई इंडियन्ससाठी अंतिम संधी, RCB बनणार अडथळा?

---Advertisement---

आज महिला प्रीमियर लीग स्पर्धेचा 20 वा सामना खेळला जाणार आहे. लीग मधील आज शेवटचा सामना खेळला जाणार आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध मुंबई इंडियन्स संघामध्ये सामना होणार आहे. तसेच दिल्ली कॅपिटल्स संघावर सुद्धा आज सगळ्यांच्या नजरा असणार आहेत. स्मृति मंधनाच्या नेतृत्वाखाली आरसीबी संघ प्लेऑफ मधून बाहेर पडला आहे. पण जाता जाता ते मुंबई इंडियन्स संघाचाही खेळ बिघडवून जाऊ शकतात. आज दिल्लीचा संघ आरसीबीला सपोर्ट करेल.

मुंबई इंडियन्स संघाने त्यांची जागा प्लेऑफ मध्ये आधीच पक्की केली आहे. 2025 च्या प्लेऑफ मध्ये जाणारे तीन संघ पक्के झालेले आहेत. दिल्ली कॅपिटल्स, मुंबई इंडियन्स आणि गुजरात जायंट्स या संघांनी प्लेऑफ मध्ये त्यांची जागा पक्की केली आहे, पण अजून एका संघाचा निर्णय होणार आहे. जो संघ डायरेक्ट अंतिम सामन्यात प्रवेश करेल. यामुळे दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यामध्ये आव्हान आहे.

आता महिला प्रीमियर लीगच्या पॉईंट्स टेबल मध्ये टॉपच्या स्थानी दिल्ली कॅपिटल्स संघ आहे. ज्या संघाने 8 सामने खेळले आहेत. त्यामध्ये 5 सामन्यात त्यांनी विजय मिळवला आहे आणि त्यांचे 10 गुण आहेत. तसेच मुंबई इंडियन्स संघाने 7 सामन्यांमध्ये 5 विजय मिळवले आहेत. त्यांचेही 10 गुण आहेत. पण नेट रन रेटच्या हिशोबाने ते दुसऱ्या स्थानी आहेत. आज जर मुंबई इंडियन्स संघ जिंकला तर दिल्ली कॅपिटल्स पॉईंट्स टेबलमध्ये दुसऱ्या स्थानावर येईल आणि मुंबई इंडियन्स पहिल्या स्थानावर पोहोचेल.

महिला प्रीमियर लीग चरणातील सामने संपल्यानंतर टॉप तीन संघ प्लेऑफ साठी क्वालिफाय करतात. तसेच टॉपचा संघ डायरेक्ट अंतिम सामन्यासाठी प्रवेश करतो. तसेच दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावरील संघ अंतिम सामन्यात पोहोचण्यासाठी एलिमिनेटर सामने खेळतात.

जर आज स्मृती मंधनाच्या नेतृत्वाखाली रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने मुंबई इंडियन्सला पराभूत केले तर, डब्ल्यूपीएलच्या अंतिम सामन्यात दिल्ली कॅपिटल्स पोहोचेल आणि जर मुंबई इंडियन्सने विजय मिळवला तर अंतिम सामन्यात मुंबई इंडियन्स संघ धडक मारेल. त्यानंतर दिल्ली कॅपिटल्सला एलिमिनेटर सामना खेळावा लागेल.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध मुंबई इंडियन्स हा सामना ब्रेबॉर्न स्टेडियमवर आज 11 मार्च रोजी संध्याकाळी 7.30 वाजता खेळला जाणार आहे. डब्ल्यूपीएल सामन्याचं लाईव्ह प्रसारण स्पोर्ट्स 18 नेटवर्क चॅनलवर होणार आहे. तसेच लाईव्ह स्ट्रीमिंग जिओहॉटस्टार आणि वेबसाईटवर दिसेल.

हेही वाचा 

“मी प्रार्थना करतो की RCB आयपीएल ट्राॅफी जिंकू नये” ‘या’ माजी क्रिकेटपटूचे मोठे विधान!

ICC ने स्पष्ट केले कारण, चॅम्पियन्स ट्रॉफी फाइनलमध्ये PCB अधिकाऱ्यांची अनुपस्थिती का?

चौकार-षटकार काही नवीन नाही! श्रेयस अय्यरचा जबरदस्त आत्मविश्वास

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---