---Advertisement---

RCB vs KKR: पावसामुळे आरसीबी केकेआर सामना रद्द होणार का? जाणून घ्या महत्वाची अपडेट समोर

On: शनिवार, मे 17, 2025 3:49 PM
---Advertisement---

आयपीएल 2025 स्पर्धेला पुन्हा आरंभ होत आहे. तत्पूर्वी आजच्या सामन्यावर पावसाचे सावट आहे. 17 मे म्हणजेच शनिवार रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू आणि कोलकाता नाईट रायडर्स संघामध्ये बंगळूरूमध्ये सामना होणार आहे. या सामन्यादरम्यान संध्याकाळी पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार शनिवार दुपारपासून ते शनिवार रात्रीपर्यंत वाऱ्यासह मोठ्या पावसाची शक्यता आहे. भारतीय हवामान विभाग वेबसाईटवर संध्याकाळी एक-दोन वेळा ढगांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवली जात आहे.

सामन्याच्या एक दिवस आधी पावसामुळे आरसीबी आणि केकेआर दोन्ही संघांना सरावादरम्यान अडचण आली होती. आरसीबी संघाचं दोन ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत सरावाचं सेशन होतं. टीम डायरेक्टर बोबट यांच्यानुसार त्यांनी हवामानचा अंदाज बघून हा निर्णय घेतला होता. केकेआरने संध्याकाळी 5 नंतर सराव सुरू केला, पण ते 6.30 पर्यंतच सराव करू शकले. शहराच्या सर्वच ठिकाणी खूप मोठा पाऊस झाला.

जर पावसाच्या कारणाने सामना रद्द झाला तर याचा अर्थ होतो की केकेआरच्या प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या सर्व आशा तिथेच संपतील. त्यांचे सध्या 11 गुण आहेत आणि दोन सामने उरले आहेत. त्याच्या अनुसार बघायचे झाल्यास, केकेआर 14 गुणांपर्यंत पोहोचेल. जे की प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी तेवढे गुण आवश्यक नसतील. हंगामाच्या सुरुवातीला पंजाब किंग्स विरुद्ध त्यांचा एक सामना पावसाच्या कारणे मध्येच रद्द झाला होता.

पावसाच्या कारणाने सामना जरी रद्द झाला तरी सुद्धा आरसीबीला प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी कोणतीही कसरत करावी लागणार नाही. आरसीबीकडे टॉप दोन संघांमध्ये पोहोचण्याची संधी आहे. मागच्या महिन्यात पावसाच्या कारणाने आरसीबी- पंजाब संघात 14 षटकांचा सामना करण्यात आला होता. बोबट यांनी म्हटले की, हवामानात बदल झाला आणि पावसाची शक्यता निर्माण झाली आणि पाऊस पडला तर मी काहीही करू शकत नाही.

चिन्नास्वामी स्टेडियममध्ये शानदार ड्रेनेज सिस्टीम आहे. जरी पाऊस झाला तरीही काही क्षणानंतर सामना पुन्हा सुरू केला जाऊ शकतो. बोबट यांनी सामन्याच्या एक दिवस आधी म्हटले होते की, जेव्हा तुम्ही सामन्याच्या दिवशी पोहोचता तेव्हा तुम्ही हा अंदाजा लावू शकत नाही की त्या दिवशी काय होऊ शकते.

बंगळूरला आता 23 मे रोजी सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध त्यांच्या घरेलू मैदानावर सामना खेळायचा आहे. तसेच मुंबईमध्ये सुद्धा पाऊस पडत आहे, जिथे 21 मे रोजी मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्समध्ये सामना होणार आहे. त्याचबरोबर आजच्या सामन्यात पाऊस खोडा घालेल का हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---