---Advertisement---

RCB vs PBKS: फायनल सामन्यात टिम डेव्हिड खेळणार की नाही? कर्णधाराचे मोठे वक्तव्य!

On: सोमवार, जून 2, 2025 10:18 PM
---Advertisement---

Tim David: आयपीएल 2025चा फायनल सामना मंगळवारी संध्याकाळी (3 जून) रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल. या सामन्यासाठी आरसीबी आणि पंजाब किंग्ज (RCB vs PBKS Final IPL 2025) संघात खेळला जाईल. दरम्यान ट्रॉफी जिंकण्यासाठी दोन्ही जीवाचं रान करताना दिसतील. तत्पूर्वी पहिल्या क्वालिफायरमध्ये आरसीबीचा संघ आपला स्टार खेळाडू टिम डेव्हिडशिवाय (Tim David) मैदानात उतरला. आता डेव्हिड फायनल सामन्यात प्लेइंग 11 मध्ये असेल की नाही? हा सर्वात मोठा प्रश्न आहे. दरम्यान, कर्णधार रजत पाटीदारने टिम डेव्हिडच्या फिटनेसबाबत मोठी अपडेट दिली आहे.

फायनल सामन्यापूर्वी पत्रकार परिषदेत बोलताना रजत पाटीदारने टिम डेव्हिडच्या फिटनेसबाबत मोठी अपडेट दिली आहे. तो म्हणाला, फायनल सामन्यात डेव्हिड प्लेइंग 11 मध्ये असेल की नाही? यावर वैद्यकीय पथक शेवटच्या क्षणी निर्णय घेईल. रजत म्हणाला, “डॉक्टर उपस्थित आहेत आणि टिम डेव्हिड खेळेल की नाही? हे आम्हाला संध्याकाळपर्यंत कळेल.” पण, त्यांनी आशा व्यक्त केली आहे की डेव्हिड वेळेत बरा होईल. सनरायझर्स हैदराबादविरुद्ध खेळलेल्या सामन्यात फिल्डिंग करताना टिम डेव्हिडला दुखापत झाली होती. यानंतर तो लखनऊमध्ये आणि नंतर पहिल्या क्वालिफायर सामन्यात खेळू शकला नाही. (Will Team David play in the final match or not? Rajat Patidar speaks on this)

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने 9 वर्षांनी आयपीएलच्या फायनलमध्ये आपले स्थान निश्चित केले आहे. याआधी संघाने 3 वेळा जेतेपदाचा सामना खेळला आहे. तथापि, तिन्ही वेळा आरसीबीला फायनलमध्ये पराभव स्वीकारावा लागला. आता आरसीबी या वर्षी 17 वर्षांचा दुष्काळ संपवण्यात यशस्वी होते की नाही? हे पाहणे मनोरंजक ठरेल. या हंगामात आरसीबी एक संघ म्हणून जबरदस्त फॉर्ममध्ये दिसला आहे. फलंदाजी असो वा गोलंदाजी, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने खेळाच्या प्रत्येक विभागात पूर्णपणे वर्चस्व गाजवले आहे. आरसीबीने यापूर्वी 3 वेळा फायनलमध्ये प्रवेश केला आहे, परंतु आतापर्यंत संघाचे वर्चस्व कधीही असे दिसले नव्हते.

दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग 11 (Probable playing 11s for Punjab and Bangalore)

राॅयल चॅलेंजर्स बंगळुरू– विराट कोहली, फिल साल्ट, रजत पाटीदार (कर्णधार), लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा, रोमारियो शेफर्ड, कृणाल पांड्या, भुवनेश्वर कुमार, यश दयाल, जोश हेझलवूड, सुयश शर्मा

पंजाब किंग्ज– प्रियांश आर्य, जोश इंग्लिस, श्रेयस अय्यर (कर्णधार), नेहल वढेरा, मार्कस स्टाॅयनिस, शशांक सिंग, अझमतुल्ला उमरझाई, काइल जेमिसन, विजयकुमार वैशाख, अर्शदीप सिंग, युजवेंद्र चहल

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---