---Advertisement---

सिंदूर ऑपरेशनचा IPL वर पडणार का प्रभाव? चेन्नई विरूद्ध कोलकाता सामना होणार रद्द?

On: बुधवार, मे 7, 2025 5:00 PM
---Advertisement---

भारतीय लष्कराने पाकिस्तानवर हवाई हल्ला करून पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला आहे. ही माहिती भारतीय लष्कराच्या सोशल मीडिया अकाउंटवरून देण्यात आली आहे. पण पाकिस्तानवर प्रत्युत्तर दिल्यानंतर, याचा आयपीएलवर काही परिणाम होऊ शकतो की नाही? याबद्दल अटकळ बांधली जात आहे. चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स (CSK vs KKR) यांच्यातील सामना आज खेळला जाईल की नाही? बीसीसीआयने (BCCI) यासंदर्भात एक निवेदन जारी केले आहे.

एएनआय वृत्तसंस्थेनुसार, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या सूत्रांनी माहिती दिली आहे की, भारत आणि पाकिस्तानमधील (India vs Pakistan) या तणावाचा आयपीएलच्या चालू हंगामावर कोणताही परिणाम होणार नाही. आयपीएल 2025 जसा सुरू आहे तसाच सुरू राहील. त्याच वेळी, आज (7 मे) होणाऱ्या चेन्नई आणि कोलकाता सामन्यावर या तणावाचा कोणताही परिणाम होणार नाही. आजचा सीएसके विरुद्ध केकेआर सामना नियोजित वेळेनुसार संध्याकाळी 7:30 वाजता सुरू होईल.

चेन्नई सुपर किंग्जने यंदाच्या आयपीएल हंगामात आतापर्यंत 11 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये संघाने फक्त 2 सामने जिंकले आहेत, तर 9 सामन्यांमध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला आहे. कोलकाता नाईट रायडर्सनेही आतापर्यंत 11 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये केकेआर संघाने 5 जिंकले आहेत आणि 5 गमावले आहेत, तर 1 सामना अनिर्णित राहिला आहे. कोलकाता 11 गुणांसह गुणतालिकेत 6व्या क्रमांकावर आहे. आजचा सामना केकेआरसाठी करो या मरो असणार आहे. तसेच प्लेऑफमध्ये पात्र होण्यासाठी कोलकाताला उर्वरित सर्व 3 सामने जिंकावे लागतील.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---