---Advertisement---

IPL 2025 नंतर ‘या’ खेळाडूचं भारतीय संघात पदार्पण नक्की? रवी शास्त्रींची भविष्यवाणी

On: शुक्रवार, मे 2, 2025 7:32 PM
---Advertisement---

इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेने काही युवा खेळाडूंना रातोरात स्टार बनवले आहे. आता 23 वर्षीय साई सुदर्शन त्याच वाटेवर पुढे जात आहे. ज्याने आत्तापर्यंत आयपीएल 2025 मध्ये 456 धावा केल्या आहेत. सुदर्शन ऑरेंज कॅप जिंकण्यासाठी प्रभावी दावेदारांमध्ये एक आहे. तत्पूर्वी भारतीय क्रिकेट संघाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी त्याचे खूप कौतुक केले आहे. शास्त्री यांचे म्हणणे आहे की, सुदर्शन तिन्ही फॉरमॅटमध्ये चांगलं प्रदर्शन करू शकतो आणि लवकरच त्याने भारतीय संघामध्ये पदार्पण केले पाहिजे.

आयपीएल 2025 स्पर्धेनंतर भारतीय संघाला इंग्लंड दौऱ्यावर जायचे आहे, जिथे त्यांना 5 कसोटी सामने खेळायचे आहेत. शास्त्री यांचे म्हणणे आहे की, सुदर्शनला इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय स्क्वाडमध्ये सामील केले गेले पाहिजे. तो आयपीएल स्पर्धेत गुजरात संघासाठी खेळत आहे आणि ऑरेंज कॅपच्या रेसमध्ये आता सूर्यकुमार यादव नंतर दुसऱ्या स्थानावर आहे. सूर्यकुमारने आत्तापर्यंत या हंगामात 475 धावा केल्या आहेत.

एका मीडिया इंटरव्यूमध्ये रवी शास्त्री यांनी म्हटले आहे की, मी मानतो की साई सुदर्शन सर्व फॉरमॅटमध्ये चांगलं प्रदर्शन करू शकतो. त्याचा एक वेगळाच फॉर्म आहे आणि माझी नजर त्याच्यावर टिकून राहणार आहे. एक उजव्या हाताचा फलंदाज इंग्लंडची कंडीशन, त्यांची टेकनिक तो ज्या प्रकारे खेळतो ते सर्व बघता माझं मानणं आहे की, टीम इंडियामध्ये एन्ट्री घेणाऱ्या सर्व नवीन खेळाडूंच्या रेसमध्ये तो सर्वात पुढे असेल.

साई सुदर्शन बद्दल बोलायचे झाल्यास, आयपीएल 2024 मध्ये सुद्धा त्याने चांगली फलंदाजी केली होती. त्यादरम्यान त्याने 527 धावा केल्या होत्या. या हंगामातही त्याने सातत्याने चांगलं प्रदर्शन केलं आहे.


मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह दुखापती मधून सावरल्यानंतर भारतीय संघात परतले आहेत. हे दोन्ही घातक वेगवान गोलंदाज संघात सामील असले तरीही रवी शास्त्री म्हणाले, टीम इंडियाला एका डाव्या हाताच्या गोलंदाजाची कमी भासत आहे. तसेच ते असेही म्हणाले, एका डाव्या हाताचा गोलंदाज भारतीय संघात असावा असे मला वाटते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---