ऑस्ट्रेलियाचा दिग्गज सलामीवर फलंदाज डेव्हिड वॉर्नर कसोटी आणि वनडे क्रिकेटमधून निवृत्त होत आहे. सध्या पाकिस्तान संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. उभय संघांतील तिसरा आणि शेवटचा कसोटी सामना 3 जानेवारी रोजी सिडनीमध्ये सुरू होईल. वॉर्नरसाठी हा कारकिर्दीतील शेवटचा कसोटी सामना असेल. तसेच वनडे क्रिकेटमधूनही त्याने निवृत्तीची घोषणा केली आहे. असे असले तरी, वॉर्नरने वनडे क्रिकेटचे दरवाजे स्वतःसाठी पूर्णपणे बंद केले नाहीत.
सिडनी कसोटी सुरू होण्याआधी सोमवारी (1 डिसेंबर) डेव्हिड वॉर्नर (David Warner) याने पत्रकार परिषदेला हजेरी लावली. यावेळी त्याने वनडे क्रिकेटमधून निवृत्तीची माहिती सर्वांना दिली. पण सोबतच पुनरगामनाचे संकेद तेखील दिले. सलामीवीर फलंदाज पुढच्या वर्षी म्हणजेच 2025 मध्ये खेळल्या जाणाऱ्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीतून (champions trophy 2025) ऑस्ट्रेलियाच्या वनडे संघात पुनरागमन करू शकतो. पण हा निर्णय वॉर्नरपेक्षा संघाच्या गरजेवर जास्त आवलंबून असेल, असेही त्याने स्पष्ट केले. त्यावेळी सलामीवीर फलंदाजाचा फॉर्म देखील महत्वाचा ठरणार आहे. “मला माहीत आहे की, आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी खेळली जाणार आहे. जर ऑस्ट्रेलियाला क्रिकेट संघाला मझी आवश्यकता असेल, तर मी चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी तयार आहे,” असे वॉर्नरने स्पष्ट केले.
दरम्यान, वॉर्नरने यावेळी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर काय करणार? या प्रश्नाचे उत्तरही दिले. दिग्गज फलंदाज निवृत्तीनंतर समालोचकाच्या भूमिकेत दिसणार, हे त्याच्या उत्तरातून स्पष्ट झाले. वॉर्नर म्हटल्याप्रमाणे तो फॉक्स चॅनलच्या कमेंट्री पॅनलचा भाग बनला आहे. यावर्षी भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये खेळल्या जाणाऱ्या बॉर्डर गावसकर कसोटी मालिकेदरम्यान, तो समालोचन करताना दिसू शकतो.
वॉर्नरच्या कारकिर्दीवर एकंदरीत नजर टाकली, तर त्याने 111 कसोटी, 161 वनडे आणि 99 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्याव्यतिरिक्त इंडियन प्रीमियर लीगमध्ये त्याने 176 सामने खेळले आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये त्याने 44.59 च्या सरासरीने 8695 धावा केल्या आहेत. वनडे क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर 6932, तर टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 2894 धावांची नोंद आहे. आयपीएलमध्ये खेळलेल्या 176 सामन्यांमध्ये वॉर्नरने 6397 धावा केल्या आहेत. (Will David Warner play Champions Trophy after retirement? Know his plan)
महत्वाच्या बातम्या –
पाकिस्तानने केली नवीन गोलंदाजी प्रशिक्षकाची घोषणा, माजी दिग्गज सांभाळणार जबाबदारी
Team India Schedule 2024: टीम इंडिया IPL आधी खेळणार कसोटी मालिका, नंतर टी20 विश्वचषक, जाणून घ्या संघाचे संपूर्ण वेळापत्रक