---Advertisement---

सुदैव म्हणतात ते हेच! कॅच सुटला, षटकारही नाही मारला अन् नो बॉलही नाही, तरी फलंदाजाला मिळाल्या ७ धावा

Will-Young
---Advertisement---

क्रिकेटमध्ये अनेकदा अनोख्या घटना घडत असतात. अशीच एक घटना न्यूझीलंड विरुद्ध बांगलादेश संघात ख्राईस्टचर्च येथे दुसरा कसोटी सामन्यात झाली आहे. एका चेंडूत न्यूझीलंडचा फलंदाज विल यंगला चक्क ७ धावा मिळाल्या. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. 

नक्की काय घडले?
तर, झाले असे की, रविवारपासून (९ जानेवारी) सुरू झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात न्यूझीलंड संघ प्रथम फलंदाजी करत होता. त्यांच्याकडून विल यंग आणि टॉम लॅथम या सलामीवीरांनी दमदार सुरुवात केली. त्यांनी २६ षटकांच्या आतच ९० धावा धावफलकावर लावल्या होत्या.

ही जोडी तोडण्यासाठी बांगलादेशच्या गोलंदाजांचा प्रयत्न सुरू होता. अशातच इबादत हुसेन गोलंदाजी करत असलेल्या २६ वे षटकाच्या शेवटच्या चेंडूवर विल यंगने फटका मारण्याचा प्रयत्न केला, पण चेंडू त्याच्या बॅटची कड घेत स्लीपच्या दिशेने गेला. मात्र, तिथे त्याचा झेल बांगलादेशी क्षेत्ररक्षकांकडून सुटला. त्यामुळे चेंडू फाईन लेगला गेला. त्यामुळे क्षेत्ररक्षकाने तो चेंडू अडवून यष्टीरक्षकाकडे फेकला. यावेळी लॅथम आणि यंग दुहेरी धावा पळत होते.

त्याचवेळी यष्टीरक्षक नुरुल हसनने तो चेंडू नॉन स्ट्रायकर एन्डला धावबाद करण्याच्या विचारात फेकला. पण, तो चेंडू क्षेत्ररक्षकांना चकमा देत थेट बाऊंड्री पार करून गेला. त्यामुळे यंगला ओव्हरथ्रोचे ४ आणि पळून काढलेल्या ३ अशा मिळून एकूण ७ धावा मिळाल्या. या घटनेवर विविध प्रतिक्रिया देखील येत आहेत.

https://twitter.com/AbdullahNeaz/status/1479991544002220033?t=T0V-xCZKgJ_ZfFAeVYJynw&s=19

 

न्यूझीलंडने उभारला धावांचा डोंगर
दरम्यान, या सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकून न्यूझीलंडला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. न्यूझीलंडनेही याचा फायदा घेत पहिल्या दिवसाखेर १ बाद ३४९ धावांचा डोंगर उभा केला आहे. यंग आणि लॅथम यांनी पहिल्या विकेटसाठी १४८ धावांची भागीदारी रचली. त्यांची भागीदारी शोरीफुल इस्लाम याने यंगला ५४ धावांवर बाद करत तोडली. पण, त्यानंतर लॅथमला डेवॉन कॉनवेने दमदार साथ दिली. पहिल्या दिवसाखेर लॅथम १८६ धावांवर आणि कॉनवे ९९ धावांवर नाबाद राहिले.

महत्त्वाच्या बातम्या – 

सनरायझर्स हैदराबादसोबतच्या संबंधाबाबत वॉर्नरने सोडले मौन; म्हणाला, ‘जर कर्णधाराला बाहेर करत असाल तर..’

केपटाऊन कसोटीत विराटने ‘एवढ्या’ धावा केल्यावर मोडणार प्रशिक्षक राहुल द्रविडचा विक्रम

ऍशेसच्या चौथ्या सामन्यासाठी इंग्लंडने घ्यावी टीम इंडियाकडून प्रेरणा, माजी दिग्गजाचा सल्ला

जोहान्सबर्ग कसोटी तर गमवलीच, पण भारतीय खेळाडूंनी वाद घालत सामन्याला लावल गालबोट | INDvsSA Clashes

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---