युएस ओपन 2018ची उपविजेती सेरेना विल्यम्सने अंतिम सामन्यात नियमांचे उल्लंघन केल्याने तिला 12 लाख रूपयांचा (17,000 डॉलर) दंड केला आहे.
रविवारी (9ऑगस्ट) झालेल्या अंतिम सामन्यात विल्यम्सला जपानच्या नाओमी ओसाकाकडून 6-2, 6-4 ने पराभव स्विकारावा लागला. यावेळी विल्यम्सने पंच कार्लोस रॅमोससोबत वाद घातला. तसेच रॅकेट जमिनीवर आपटली यामुळे तिला सामन्यात पेनाल्टी तर मिळाली पण आता तिला हा दंडही भरावा लागणार आहे.
Statement from USTA Chairman of the Board and President Katrina Adams on US Open Women's Singles Final pic.twitter.com/fYOfYy5A04
— US Open Tennis (@usopen) September 9, 2018
स्पर्धेच्या रेफ्रीने जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या विल्यम्सला 725000 रूपये (10,000 डॉलर) रॅमोस यांच्याशी शाब्दीक वाद घातल्याने, 290000 रूपये (4000 डॉलर) प्रशिक्षकांनी मदत केल्याने आणि 217000 रूपये (3000 डॉलर) रॅकेट जमिनीवर आपटल्याने असे दंड केले आहेत.
विल्यम्सला ऑस्ट्रेलियाच्या मार्गारेट कोर्टच्या एकेरीच्या 24 ग्रॅंड स्लॅमची बरोबरी करण्याची संधी होती. पण या सामन्यात ती पराभूत झाल्याने तिचे स्वप्न भंगले.
या सामन्यात विल्यम्सने रॅमोस यांना तिची माफी मागायला लावली आणि त्यांना चोर ही म्हटली. ती यावेळी इतकी चिढली होती की आयोजक तिला शांत करण्यास कोर्टवर आले होते.
पहिल्या सेटची चांगली सुरूवात केल्यावर तिला ओसाकाने चांगलेच प्रत्युत्तर देत दोन्ही सेट जिंकत जपानकडून एकेरीचे ग्रॅंड स्लॅम जिंंकणारी पहिलीच महिला ठरली आहे.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या:
–नोवाक जोकोविच तिसऱ्यांदा युएस ओपनचा विजेता
–Video: धाव घेताना केएल राहुलचा निघाला शुज; बेन स्टोक्सने केली मदत