जगातील प्रत्येक टेनिसपटूच स्वप्न असत की एकदातरी विम्बल्डनच्या हिरवळीवर एखादा सामना खेळायला मिळावा. भारताचा टेनिसपटू जीवन नेदुनचेझियानच ते स्वप्न पूर्ण झालं. परंतु त्यासाठी गेल्या २४ तासात जीवनला असंख्य खटाटोप करावे लागले.
भारताचा हा २८ वर्षीय खेळाडू प्रथमच ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या मुख्य फेरीसाठी पात्र ठरला. परंतु घोट्याच्या दुखापतीमुळे अचानक त्याचा दुहेरीतील जोडीदार ह्येन चुंगने विम्बल्डन स्पर्धेतून जीवन बरोबर खेळण्यासाठी नकार दिला. एवढं मोठं स्वप्न पूर्ण होत असताना अचानक आलेल्या ह्या संकटामुळे जीवनपुढे मोठा प्रश्न उभा राहिला.
पण म्हणतात ना, नशीब बरोबर असेल तर कोणतीही गोष्ट रोखू शकत नाही. अमेरिकेचा जॅरेड डोनाल्डसन हा खेळाडू पुढे येऊन त्याने जीवन बरोबर खेळायला होकार दिला.
ह्या वर्षी पुरुष दुहेरीमध्ये खेळायचं असेल तर दोघेही जोडीदाराचा मिळून जागतिक क्रमांक १६० किंवा त्यापेक्षा कमी लागतो. सध्या जीवनचा हा क्रमांक आहे ९५ तर त्याचा नवीन जोडीदार अमेरिकेचा जॅरेड डोनाल्डसनचा ६५. दोघांचे मिळून बरोबर १६० क्रमांक झाला आणि दोघांना शेवटच्या जागेवर मुख्य फेरीसाठी पात्र ठरता आले.
काल जेव्हा ह्येन चुंगने खेळण्यास नकार दिला तेव्हा खूप कठीण काळातून गेल्याच जीवन सांगतो. तो म्हणतो, ” ह्येनने जेव्हा दुखापतीमुळे खेळायला नकार दिला दिला मी प्रचंड दबावाखाली आलो होतो. परंतु मला याचा आनंद आहे की ह्येनने अंतिम मुदत संपायच्या आधी हे सर्व सांगितलं. ”
“मी स्पर्धा अधिकारी आणि मॅनेजर यांच्याशी याबद्दल कळ जेव्हा बोललो तेव्हा त्यांनी माझ्याकडे अजून नवीन जोडीदार शोधायला २४ तास असल्याचं सांगितलं'”
“स्पर्धेतील दुहेरीतील सर्व वाइल्ड कार्ड देऊन झाली होती. मी पात्रता फेरी खेळू शकत नव्हतो कारण मी सध्या इस्टबॉऊर्नला मुख्य फेरीत खेळत आहे. त्यामुळे क्रमवारीतील पहिल्या ६५ पर्यंतचा खेळाडू शोधणे माझ्यासाठी कठीण काम झाले होते. ”
“या सर्व घटनेच्या वेळी मला रोहन बोपण्णा आणि त्याचा फिटनेस कोच मनू बाजपेयी यांची खूप मदत झाली. आम्ही एकत्र सराव केला. संध्याकाळी ५वाजता जेराडने माझ्याबरोबर विम्बल्डनमध्ये खेळण्यात रस दाखवला. ”
जीवन या सर्व घटनेमध्ये रोहन बोपण्णाने दिलेल्या पाठिंब्याबद्दल त्याच आभार मानतो.
जीवन पुढे म्हणतो, ” जॅरेड सध्या इस्टबॉऊर्नला एकेरीसाठी आलेला आहे. मी माझी स्थिती त्याला सांगितली. त्याने त्याच्या कोच बरोबर चर्चा करून मला होकाराचा टेक्स्ट मेसेज केला. ”
“विम्बल्डन हे आपल्या खेळातील सर्वात प्रतिष्टीत स्पर्धा असून त्यात ह्या खेळायला मिळणार याचा आनंद होत आहे. गेले २४ तास हे खूप कठीण होते. ”
यावेळी भारताचे रोहन बोपण्णा, लिएंडर पेस, दिवीज शरण, पुरव राजा हे अन्य खेळाडू दुहेरीमध्ये खेळत आहे. स्पर्धेचा ड्रॉ ३० जून रोजी घोषित होणार आहे.