लंडन। रविवारी(15जुलै) झालेल्या विंबल्डन 2018च्या अंतिम सामन्यात सर्बियाच्या नोवाक जोकोविचने त्याचा चौथा विंबल्डनचा विजयी क्षण कोर्टवरील गवत खाऊन साजरा केला. हे त्याने अनेक वेळा केले असून त्याच्यासाठी ही एक प्रथाच झाली आहे.
दक्षिण आफ्रिकेच्या केवीन अॅण्डरसनला जोकोविचने 6-2, 6-2, 7-6(7/3) असे पराभूत करून 132वा विंबल्डनचा चषक जिंकला. तसेच त्याने याआधी 2011, 2014 आणि 2015चे विंबल्डन विजेतेपद जिंकले आहे.
ही स्पर्धा सुरू होण्याअगोदर जोकोविच 21व्या क्रमांकावर होता. आता तो एटीपी क्रमवारीत दहाव्या क्रमांकावर आहे.
तसेच पुरुष एकेरीत सर्वाधिक ग्रँडस्लॅम जिंकणाऱ्यामध्ये तो 13ग्रँडस्लॅम विजेतेपदांसह जोकोविच चौथ्या स्थानावर आहे. त्याच्या पुढे फेडरर(20), नदाल(17) आणि सॅम्प्रास(14) या तिघांचा क्रमांक लागतो.
Blades of glory 🌱#Wimbledon pic.twitter.com/N9S0lu7F8J
— Wimbledon (@Wimbledon) July 15, 2018
2011च्या विंबल्डनमध्ये राफेल नदालला हरवून जोकोविचने पहिलेच विजेतेपद जिंकले होते. तेव्हापासून त्याने त्याची गवत खाण्याची प्रथा सुरू केली.
“हे गवत खूपच चविष्ट आहे. माझ्यासाठी हा खूपच आंनदाचा क्षण आहे, असे तो म्हणाला.
जोकोविच हा फक्त चौथा टेनिसपटू आहे ज्याने ग्रास कोर्टवरील चारही मोठ्या स्पर्धा जिंकल्या आहेत. बीजोर्न बोर्ग, पीट सॅम्प्रास आणि आठ वेळेचा विजेता रॉजर फेडरर या तिघांनी अशी कामगिरी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
–विंबल्डन २०१८: नोव्हाक जोकोविचने पटकावले ४ थे विंबल्डन विजेतेपद
–विंबल्डन २०१८: सेरेना विल्यम्सला पराभवाचा धक्का; अँजेलिक कर्बरने जिंकले तिसरे ग्रँडस्लॅम विजेतेपद