टेनिस जगतात दरवर्षी खेळवण्यात येणाऱ्या चार ग्रँडस्लॅमपैकी सर्वात प्रतिष्ठेची समजली जाणारी विम्बल्डन ग्रँडस्लॅम स्पर्धा सोमवारी (२८ जून) सुरु झाली. मागील वर्षी दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच स्पर्धा रद्द करावी लागली होती. सोमवारपासून सुरू झालेल्या स्पर्धेच्या १३४ व्या हंगामातील पहिल्या दिवशी काही अनपेक्षित निकाल लागले. ऑल इंग्लंड क्लब इन लंडन येथे खेळल्या जाणाऱ्या या स्पर्धेच्या पहिल्या दिवशी आयोजकांनी कोरोना काळात इंग्लंडमध्ये कार्य करणाऱ्या अनेक मान्यवरांचे कौतुक केले. त्या क्षणांचा एक व्हिडिओ सध्या चांगलाच चर्चेत आहे.
विम्बल्डनने मानले कोविड योद्ध्यांचे आभार
मागील वर्षी होऊ न शकलेली विम्बल्डन स्पर्धा यावर्षी ५०% प्रेक्षकांच्या उपस्थितीत सुरू झाली. स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वी सेंटर कोर्टवर झालेल्या एका छोटेखानी समारंभात मागील वर्षभरापासून कोरोनाच्या कठीण काळात लोकांना मदत करणाऱ्या स्वयंसेवकांची तसेच शास्त्रज्ञांचे आभार आयोजकांतर्फे मानले गेले.
An opening day on Centre Court with a difference…
A special moment as we say thank you to those who have played such an important role in the response to COVID-19#Wimbledon pic.twitter.com/16dW1kQ2nr
— Wimbledon (@Wimbledon) June 28, 2021
इंग्लंडमध्ये ऑक्सफर्ड विद्यापीठाने बनवलेली कोविड प्रतिबंधक लस निर्माण करण्यात महत्त्वपूर्ण संशोधन करणाऱ्या सारा गिल्बर्ट यांचे या कार्यक्रमात विशेष कौतुक करण्यात आले. मैदानात उपस्थित असलेल्या सर्व प्रेक्षकांनी एक मिनिट भर टाळ्या वाजवत त्यांना अभिवादन केले. त्याच प्रकारे त्यांचे सहसंशोधक ऍण्ड्रू पोलार्ड व केथ ग्रीन यांचे देखील आभार मानले गेले. या सर्वांनी व्यतिरिक्त हना इंग्राम-मरे यादेखील रॉयल बॉक्समध्ये उपस्थित होत्या. त्यांनी सर्व कोविड योद्ध्यांसाठी तब्बल ३२ मिलियन पाउंड इतकी रक्कम जमा केली आहे.
पहिल्या दिवशी लागले असे निकाल
नुकतीच फ्रेंच ओपन जिंकलेला नोवाक जोकोविच याने सहजरीत्या दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. मात्र, फ्रेंच ओपनचा उपविजेता स्टेफ त्सितीपास याला पराभवाचा सामना करावा लागला. महिला गटात दहाव्या मानांकित पेट्रा क्लिटोवाला पहिल्याच फेरीत पराभूत व्हावे लागले. तर, अकरावी मानांकित गॉर्बिन मुगुरुझा हिने सोपा विजय साजरा केला.
महत्त्वाच्या बातम्या:
क्षणभर विश्रांती! इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी भारतीय खेळाडू करतायेत इंग्लंडमध्ये ‘चिल’