---Advertisement---

Wimbledon 2026: अलेक्झांडर झ्वेरेव्हला पराभूत करत यानिक सिनर सलग दुसऱ्यांदा चॅम्पियन, जिंकले कारकिर्दीतील पाचवे ग्रॅंड स्लॅम

On: सोमवार, जुलै 13, 2026 10:15 AM
---Advertisement---

जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या ईटलीच्या यानिक सिनरचा ग्रास कोर्टवरील धमाका सुरूच आहे. फिटनेसमुळे 2026 च्या फ्रेंच ओपन स्पर्धेला मुकलेल्या सिनरने विम्बल्डन 2026 मध्ये चमकदार कामगिरी करत सलग दुसऱ्यांदा विजेतेपद जिंकले आहे. रविवारी (12 जुलै) सेंटर कोर्टवर झालेल्या पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात सिनरने जर्मनीच्या अलेक्झांडर झ्वेरेव्हचा 6(7)-7(9), 7(7)-6(2), 6-3, 6-4 असा पराभव केला. सिनरचे हे सलग दुसरे विम्बल्डन विजेतेपद, तर त्याच्या कारकिर्दीतील एकूण पाचवे ग्रॅंड स्लॅम ठरले.

मॅच पॉइंटवर एक उत्तम फोरहॅंड विनर मारल्यानंतर विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी सिनर कोर्टवरील गवतावर पाठीवर झोपला. मागील वर्षीही त्याने फ्रेंच ओपनमध्ये कार्लोस अल्काराझविरुद्धच्या निराशाजनक कामगिरीनंतर विम्बल्डनमध्ये लक्षवेधी पुनरागमन केले होते. तेव्हाच्या विम्बल्डनच्या अंतिम सामन्यात त्याने अल्काराझचा पराभव केला होता.

सिनरसमोर झ्वेरेव्हचे आव्हान पडले फिके
झ्वेरेव्हने यंदाचे फ्रेंच ओपन जिंकले, हे त्याच्या कारकिर्दीतील पहिलेच ग्रॅंड स्लॅम ठरले. त्यामुळे तो चांगलाच आत्मविश्वासाने भरलेला होता. पहिला सेट अटीतटीचा झाला, जो झ्वेरेव्हने टाय-ब्रेकमध्ये जिंकला. दुसरा सेटही टाय-ब्रेकमध्ये गेला, ज्यामध्ये मात्र सिनरने बाजी मारली.

दुखापतीमुळे झ्वेरेव्हला वेदनादायक स्थितीत पाहून सिनरने त्याच्याकडे धाव घेतली. काही क्षणानंतर झ्वेरेव्ह खेळत राहिला, मात्र त्याची लय बिघडली. एक फोरहॅंड शॉट चुकल्यानंतर त्याने रागाने रॅकेट फेकली. यामध्ये सिनरने ५-३ अशी आघाडी घेत सेटही जिंकला.

झ्वेरेव्ह वारंवार चुका करतच राहिला आणि चौथ्या सेटमध्येही सिनरने बाजी मारली. हे त्याचे या हंगामातील पहिलेच ग्रॅंड स्लॅम ठरले. याआधी तो ऑस्ट्रेलियन ओपनच्या उपांत्य फेरीत आणि फ्रेंच ओपनच्या दुसऱ्या फेरीत पराभूत झाला होता.

सिनरचे ग्रॅंड स्लॅम्स
सिनरने आतापर्यंत दोन ऑस्ट्रेलियन ओपन, दोन विम्बल्डन आणि एक युएस ओपन विजेतेपद पटकावले आहेत. 2025 मध्ये त्याला फ्रेंच ओपनच्या अंतिम फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे त्याचे पहिले फ्रेंच ओपन जिंकण्याचे स्वप्न भंगले.

पराभवानंतरही झ्वेरेव्हला क्रमवारीत फायदा
तसेच या पराभवानंतरही झ्वेरेव्हला क्रमवारीत फायदा होणार आहे. तो ताज्या एटीपी क्रमवारीमध्ये अल्काराझला मागे टाकून दुसऱ्या क्रमांकावर येईल.अल्काराझ दुखापतीमुळे यंदाच्या फ्रेंच ओपन आणि विम्बल्डन या दोन्ही ग्रॅंड स्लॅम स्पर्धांना मुकला. (Wimbledon 2026 Jannik Sinner defeats Alexander Zverev to become champion for the second consecutive time)

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---