लंडन | यावर्षीपासून विंबल्डनच्या बक्षिसांची रक्कम वाढवली जाणार आहे. ही बक्षिसांची रक्कम गेली वर्षांपेक्षा ७.६% ने वाढवण्यात आली आहे.
यावर्षी विजेत्यांनी एकूण बक्षिसांची रक्कम ही ३४ मिलियन पौंड (अंदाजे ३०० कोटी )देण्यात येणार आहे. २००८मध्ये या स्पर्धेत एकूण बक्षिसांची रक्कम ही ११.८ मिलियन पौंड देण्यात आली होती.
यातील २.२५ मिलियन पौंड रक्कम ही पुरुष आणि महिला एकेरीच्या विजेत्याला मिळणार आहे. गेल्या वर्षी ही रक्कम २.२ मिलियन पौंड होती.
यावर्षी आॅस्ट्रेलियन ओपनला बक्षिस म्हणून ४१.३२ मिलियन डाॅलर देण्यात आले होते. त्यापेक्षा ही रक्कम ५ मिलियन डाॅलरने जास्त आहे.
फ्रेंच ओपनला यावेळी बक्षिसाची रक्कम ४७.१८ मिलियन डाॅलर असणार आहे. ही रक्कम विंबल्डनपेक्षा अर्धा मिलियन डाॅलरने जास्त आहे.
वर्षाच्या शेवटची ग्रॅंडस्लॅम स्पर्धा अमेरिकन ओपन आॅगस्ट महिन्यात होत असून त्यांनी अजून आपली बक्षिस रक्कम जाहिर केली नाही.
Prize money headlines for The Championships 2018, which demonstrate our continued commitment to do what we can for players who need our help the most…#Wimbledon pic.twitter.com/4gQrPyeWxK
— Wimbledon (@Wimbledon) May 1, 2018
विंबल्डन ही एकमेव ग्रॅंडस्लॅम स्पर्धा आहे जी ग्रास कोर्टवर खेळवली जाते.ती यावर्षी २ जूलै ते १५ जूलै या काळात होणार आहे.
यावर्षी ग्रॅंडस्लॅम स्पर्धांमध्ये दिल्या जाणाऱ्या बक्षिसांच्या एकूण रकमा-
४१.३२ मिलियन डाॅलर- @AustralianOpen
४७.१८ मिलियन डाॅलर- @rolandgarros
४६.५७ मिलियन डाॅलर- @Wimbledon
घोषीत नाही- @usopen #म #मराठी @MarathiBrain @MarathiRT @BeyondMarathi @HashTagMarathi— Sharad Bodage (@SharadBodage) May 2, 2018
महत्त्वाच्या बातम्या –
–पराभूत होऊनही मुंबईच्या हार्दिक पंड्या जिंकली सर्वांची मने
-म्हणून षटकार किंग युवराज दादाची कीट बॅग आवरायचा
–भारताचे आयसीसी कसोटी क्रमवारीत मक्तेदारी कायम
-एकदिवस सौरव गांगुली होणार बंगालचा मुख्यमंत्री!
-क्रिकेटर जेव्हा विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ग्लोव्हजमध्ये ठेवतो स्क्वॅशचा चेंडू…