बॉल बॉइज आणि गर्ल्स बरोबर गैरवर्तवणुक केल्यास त्या टेनिसपटूंना दंड करण्याचे विम्बल्डनने मान्य केले असून याबाबतची माहिती विम्बल्डचे मिडिया डायरेक्टर मिक देसमॉंडने दिली आहे.
मागच्या महिन्यात झालेल्या शेनझेन ओपनमध्ये स्पेनचा टेनिसपटू फर्नांडो वेरदॅस्कोने बॉल बॉयसोबत केलेल्या गैरवर्तवणुकचा व्हिडियो सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. यावेळी त्याने बॉल बॉयने उशिरा टॉवेल आणून दिल्याने चांगली वागणुक दिली नव्हती.
“बॉल बॉइज आणि गर्ल्स हे त्यांची काम चांगल्या रीतीने करतात पण काही वेळेस टेनिसपटूंना त्यांच्या भावनांवर ताबा नसतो”, असे म्हणत महान टेनिसपटू रॉजर फेडररने बॉल बॉइज आणि गर्ल्संना योग्य ती वागणुक द्यावी या विधानाला दुजोरा दिला आहे.
तसेच ते टेनिस कोर्टवरील कोणतेही वेतन न घेताही काम करणारे स्वंयसेवक आहेत, असेही फेडरर म्हणाला. त्यानेही बॉल बॉय म्हणून कोर्टवर काम केले आहे.
विम्बल्डनने त्यांची बॉल बॉयची रीत मोडत टेनिसपटूंनी स्वत: टॉवेल घ्यावे ही कल्पना वेरदॅस्कोने सुचवली आहे.
‘टेनिसपटूंनी स्वत: टॉवेल घ्यावा या नियमाचे काय झाले आणि बॉल उचलणाऱ्यांनी फक्त बॉलकडेच लक्ष द्यावे’, असे यावेळी ब्रिटनचा टेनिसपटू अॅंडी मरेची आई ज्युदी मरेने ट्विटरवर प्रश्न केला होता.
How to ruin some kid’s tennis dream. Fernando Verdasco is a prick with an epic sense of entitlement pic.twitter.com/qym9ZXDdJ8
— Richard Morton (@Lionheart1970) October 1, 2018
पुढील महिन्यात सुरू मिलानच्या जेन एटीपी अंतिम फेरीत टेनिसपटूंनी टॉवेल रॅकचा वापर करावा हा नियम सुरू करणार आहेत. 21 पुरूषांच्या या स्पर्धेचा शेवट होत असून यात बॉल बॉइज आणि गर्ल्स फक्त बॉलकडेच लक्ष देणार आहेत.
महत्त्वाच्या बातम्या:
–आयसीसीने पहिल्यांदाच जाहिर केली महिलांची टी२० क्रमवारी; भारतीय संघ आहे या स्थानावर
–वानखेडे ऐवजी या मैदानावर होणार भारत विरुद्ध विंडिज चौथा वनडे सामना
–राफेल नदालची पूरग्रस्तांना मदत; फेडरर आणि जोकोविचनेही केले कौतुक