2 जुलै ते 15 जुलै दरम्यान होणाऱ्या विंम्बलडन स्पर्धेसाठी ऑल इंग्लंड टेनिस क्लबने 26 जून रोजी स्पर्धेतील महिला व पुरूष खेळाडूंचे मानांकन जाहीर केले.
पुरूष गटात एटीपी क्रमवारीत दुसऱ्या स्थानी असलेला स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडररला विंम्बलडनचे अव्वंल मानांकन मिळाले आहे.
तर एटीपी क्रमवारीत अव्वल असलेला स्पेनच्या राफेल नदालला द्वितीय मानांकन देण्यात आले आहे. नदालने नुकतेच कारकिर्दीतील फ्रेंच ओपनचे 11 वे विजेतेपद मिळवले होते.
ब्रिटनचा लोकल बॉय असलेल्या काइल एडमंडला स्पर्धेत 22 वे मानांकन आहे.
महिलांमध्ये ड्ब्लयुटीए क्रमवारीत प्रथम स्थानी असलेल्या रोमानियाच्या सिमोना हालेपला अव्वल मानांकन मिळाले आहे.
तर ड्ब्लयुटीए क्रमवारीत दुसऱ्या स्थानी असलेल्या डेनमार्कच्या कॅरोलिन वॉझोनिकीला द्वितीय मानांकन मिळाले आहे.
विंम्बलडन 2017 ची विजेती गार्बिन मुगुरूझाला तिसरे मानांकन मिळाले आहे.
गेले काही दिवस टेनिसपासून दूर असलेल्या सुपर मॉम सरेना विलियम्सला 25 वे मानांकन मिळाले आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
-वनडे मालिकेत सपाटून मार खालेल्ली टीम आॅस्ट्रेलिया प्रतिष्ठेसाठी आज मैदानात
-युजवेंद्र चहलने २०१९ विश्वचषकाबद्दल केले मोठे वक्तव्य