लंडन। रविवारी(15 जुलै) पार पडलेल्या विंबल्डनच्या अंतिम सामन्यात सर्बियाच्या नोव्हाक जोकोविचने दक्षिण आफ्रिकेच्या केविन अँडरसन विरुद्ध विजय मिळवून चौथे विंबल्डनचे विजेतेपद मिळवले.
मात्र त्याची ही लढत त्याचा 3 वर्षांचा मुलगा स्टीफनला पाहता आली नाही. कारण विंबल्डनच्या नियमाप्रमाणे 5 वर्षांखालील मुलांना सेंटर कोर्टवर सामना सुरु असताना येण्याची परवानगी नाही. या नियमामुळे स्टीफनला सामना संपल्यानंतरच ट्रॉफी वितरणाच्या सोहळ्यासाठी कोर्टवर येता आले.
2016 नंतर पहिल्यांदाच ग्रँडस्लॅमचे विजेतेपद मिळवणारा जोकोविच विजेतेपदाची ट्रॉफी स्विकारल्यानंतर त्याच्या मुलाला पाहुन भावूक झाला होता.
याबद्दल ट्रॉफी स्विकारल्यानंतर तो म्हणाला, “माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच मला डॅडी,डॅडी म्हणून कोणीतरी पाठिंबा देत आहे.”
“त्याला सामना पाहता आला नाही कारण तो 5 वर्षांपेक्षा कमी वयाचा आहे. पण आम्हाला आशा होती, जर मी विजेतेपदाची ट्रॉफी उचलली तर त्याचा तो साक्षीदार होईल आणि तो इथे उपस्थित आहे.”
जोकोविच पुढे म्हणाला, ” मी यापेक्षा आनंदी असू शकत नाही, त्याला (स्टीफन), माझी पत्नी आणि माझ्या टीमला इथे पाहुन मी भावूक झालो आहे.”
यावेळी जोकोविचची पत्नीही त्याच्या मुलासह उपस्थित होती.
"For the first time in my life, I have someone screaming daddy, daddy!"
A 13th Grand Slam title for @DjokerNole, but this one will hold a special place in his heart 👪#Wimbledon pic.twitter.com/sQRClwWT0i
— Wimbledon (@Wimbledon) July 15, 2018
A hug for the #Wimbledon champion… 🤗 pic.twitter.com/PlAlq1EnZv
— Wimbledon (@Wimbledon) July 15, 2018