---Advertisement---

राम मंदीर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी दक्षिण आफ्रिकेतही बनले वातावरण! केशव महाराजचा खास संदेश

On: रविवार, जानेवारी 21, 2024 7:06 PM
Keshav Maharaj on Ram Mandir PranPratishtha
---Advertisement---

अयोध्येतील राम मंदीर प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम दिमाखात पार पडत आहे. समोवारी (22 जानेवारी) आयोजित या कार्यक्रमासाठी अयोध्येत राम भक्त मोठ्या संख्येने एकत्र येणार आहेत. यात भारतात सर्व श्रेत्रांमध्ये आपल्या कामाचा ठसा उमटवणारे नामांकीत चेहरे देखील असतील. राम मंदीराच्या प्राण प्रतिष्ठा कार्यक्रमाची आतुरता केवळ भारतात नाही, तर भारताबाहेर देखील पाहायला मिळत आहे. दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा फिरकीपटू केशव महाराज यानेही स्वदेशी हिंदू समुदायाला प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

जगातील जवळपास प्रत्येक देशात भारतीय वंशाचे लोकसंख्या पाहायला मिळते. दक्षिण आफ्रिका देखील याला अपवाद नाही. त्यांचा फिरकीपटू गोलंदाज केशव महाराज (Keshav Maharaj) हादेखील मुळचा भारतीय वंशाचा आहे. सोमवारी (22 जानेवारी) होणाऱ्या राम मंदीर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त महाराजने स्वदेसी हिंदूंना शुभेच्छा दिल्या आहेत. रविवारी (21 जानेवारी) त्याने हा व्हिडिओ शेअर केला. केशव महाराज या व्हिडिओत म्हणत आहे की, “दक्षिण आफ्रिकेत राहणाऱ्या सर्व हिंदू समुदाय आणि इतर सर्वांना अयोध्येत होत असलेल्या राम मंदीर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या शुभेच्छा. जय श्री राम.” (Jai Shri Ram)

केशव महाराज एक मोठा राम भक्त आहे. अलिकडेच भारतीय संघ कसोटी मालिका खेळण्यासाठी दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर गेला होता. कसोटी मालिकेत जेव्हा कधी केशव महाराज मैदानात फलंदाजीला यायचा, तेव्हा ‘राम सिया राम’ गाणे वाजवले जात होते. केएल राहुल याने महाराज याबाबत प्रश्न देखील विचारला होता.

केशव महाराज एका मुलाखतीत असेही म्हणाला होता की, “अयोध्येत बनत असलेल्या राम मंदीरात जायला आवडेल. पुढच्या आठवड्यात प्राणप्रतिष्ठा सोहळा आहे. पण मी दक्षिण आफ्रिकेत एसए20 लीग खेलत असेल. पण येत्या काळात भारतात गेलो, तर अयोध्येत नक्की जाईल.” दरम्यान, 2023 विश्वचषक स्पर्धेआधी दक्षिण आफ्रिका संघ भारतात आला होता. या दौऱ्यात केशव महाराज संघाचा भाग असून भारतात आल्यानंतर त्याने मद्मनाथ मंदिराला भेट दिली होती. (Wishes were received from Keshav Maharaj for Ram Mandir Pranpratistha ceremony)

महत्वाच्या बातम्या – 
शोएब मलिकचा टी20 मध्ये मोठा विक्रम, आजपर्यंत एकाही आशियाई फलंदाजाला असं करता आलं नाही
‘भारताकडे ‘विराटबॉल’ आहे…’, भारतीय दिग्गजाचा कसोटी मालिकेपूर्वी इंग्लंड संघाला मोठा इशारा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---