पुणे (11 मार्च 2024) – के. एम. पी. युवा कबड्डी सिरीज 2024 मधील ‘अ’ गटातील लढतीचा आजचा शेवटचा सामना बीड विरुद्ध धुळे या संघात झाला. बीड संघ टॉप 4 मधील संघात आधीच प्रवेश केला होता तर धुळे संघ या शर्यतीतून बाहेर पडल्याने हा सामना औपचारिक होता. धुळे च्या अक्षय पाटील ने पहिला गुण मिळवत संघाचा खात उघडला तर पुढील चढाईत बीडच्या शंकर मेघाने ने 2 गुण मिळवत आघाडी मिळवली.
पहिल्या दहा मिनिटाच्या खेळा पर्यत सामना चुरशीचा झाला. 7-7 असा बरोबरी नंतर शंकर मेघाने ने सुपर टेन करत संघाला आघाडी मिळवून दिली. बीड संघाने धुळे संघाला ऑल आऊट करत मध्यंतरापुर्वी 21-14 अशी महत्वपूर्ण आघाडी घेतली होती. तर धुळे संघाकडून अक्षय पाटील ने चांगले गुण मिळवले. मध्यंतरा नंतरही आघाडी कायम ठेवत बीड संघाने सामन्यावर पकड केली.
बीडच्या शंकर मेघाने ला सौरभ राठोड ने चांगली साथ दिली. बीड संघाने पुन्हा एकदा ऑल आऊट करत आपली आघाडी वाढवली. अखेर बीड संघाने 35-24 असा विजय मिळवत गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर झेप घेतली. बीड कडून शंकर मेघाने सर्वाधिक 15 गुण मिळवले तर सौरभ राठोड ने अष्टपैलू खेळ करत महत्वपूर्ण भूमिका निभावली. तर धुलेच्या अक्षय पाटील ने 12 गुण मिळवले. (With their fifth win, Beed jumped to the third position)
बेस्ट रेडर- शंकर मेघाने, बीड
बेस्ट डिफेंडर- सौरभ राठोड, बीड
कबड्डी का कमाल- शशिकांत दास, बीड
महत्वाच्या बातम्या –
IPL 2024 : मोठी बातमी! RCB च्या सामन्यांचे वेळापत्रक बदलणार, बंगळुरूमध्ये ऊद्भवली मोठी समस्या
सात्विक-चिराग जोडीनं जिंकली फ्रेंच ओपन स्पर्धा, तैवानच्या जोडीचा सरळ गेममध्ये पराभव