वूमेन्स महाराष्ट्र प्रीमियर लीग म्हणजेच WMPL 2025 पहिल्या हंगामाची शानदार सुरुवाती झाली. या स्पर्धेत एकूण चार संघ भिडले. ज्यामध्ये अंतिम सामन्यात सोलापूर स्मॅशर्स आणि पुणे वाॅरियर्स हे संघ पात्र ठरले आहेत. या दोन्ही संघांनी स्पर्धेत चांगली कामगिरी केली, विशेषत: पुणे वाॅरियर्स संघाने. अनुजा पाटीलच्या नेतृत्वाखाली संघाने लीग स्टेजमधील सर्व 6 सामने जिंकले, तर सोलापूर स्मॅशर्सने 6 पैकी 4 सामने जिंकले.
WMPL 2025 चा अंतिम सामना उद्या म्हजेच शनिवारी (14 जून) रोजी पुण्यातील गहुंजे येथील एमसीए इंटरनॅशन स्टेडियमवर होणार आहे. हा सामना सायंकाळी 7 वाजता खेळवला जाईल. या सामन्यासाठी प्रेक्षकांना मोफत प्रवेश असणार आहे. शिवाय एमपीएल व डब्ल्यूएमपीएल मधील सर्व सामने हे चाहत्यांसाठी विनामूल्य आहेत. त्यामुळे तुम्हाला मोफतमध्ये स्टेडियममध्ये प्रवेश मिळणार आहे.
पुणे वाॅरियर्सबद्दल बोलायचे झाले तर संघ या स्पर्धेत अजिंक्य आहे. पुण्याने एकही सामना गमावला नाही. तर दुसरीकडे सोलापूर स्मॅशर्सला दोन सामन्यात पराभव पत्करावा लागला ते दोन्ही पराभव पुणे वाॅरियर्स विरुद्धच आले. त्यामुळे या अंतिम सामन्यात पुण्याचे पारडे जड आहे, असे म्हटले तर वावगं ठरणार नाही.
या स्पर्धेच्या आयोजनामुळे एमसीएचं तसच रोहित पवार यांचे समाज माध्यमातून काैतुक केले जात आहे. महिलांसाठी कोणत्याही प्रकारची टी20 लीगचे आयोजन करणारी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन ही पहिली असोसिएशन ठरली आहे, रोहित पवारांच्या अक्ष्यक्षतेखाली हे यशस्वी रित्या पार पडत आहे. यामुळे ग्रामीण भागातील मुला-मुलींना मोठं व्यसपीठ मिळाले.