गेल्या काही वर्षांपासून देशात पुरुष क्रिकेटसोबतच महिला क्रिकेट देखील लोकप्रिय होत आहे. चाहत्यांना महिला क्रिकेटमध्ये रोमांचक सामने आणि धमाकेदार फलंदाजी पाहायला मिळाली आहे. अशा प्रकारची फलंदाजी नुकतीच एका भारतीय महिला क्रिकेटपटूकडून पाहायला मिळाली. महाराष्ट्राच्या या महिला क्रिकेटपटूनं चक्क सलग 5 षटकार ठोकले. बीसीसीआयनं या पाच षटकारांचा व्हिडिओ आपल्या सोशल मीडियावर शेअर केला आहे.
महाराष्ट्र आणि रेल्वे यांच्यात सुरू असलेल्या वरिष्ठ महिला एकदिवसीय ट्रॉफी सामन्यात हा पराक्रम घडला. महाराष्ट्राची फलंदाज किरण नवगिरेनं रेल्वेची फिरकीपटू प्रीती आर बोसविरुद्ध एकापाठोपाठ पाच षटकार ठोकले. किरण नवगिरेनं सामन्याच्या पहिल्या डावात 42 व्या षटकात सलग पाच षटकार मारण्याचा पराक्रम केला.
ओव्हरचा पहिला चेंडू डॉट बॉल गेला. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर किरणनं तिच्या लाँग ऑनच्या दिशेने षटकार ठोकला. त्यानंतर तिसऱ्या चेंडूवरही तिनं जवळपास त्याच दिशेनं षटकार मारला. हा षटकार 83 मीटरचा होता. ओव्हरच्या चौथ्या चेंडूवर तिनं बॅट लाँग ऑनच्या दिशेनं स्विंग करताना पुन्हा एकदा षटकार मारला. यानंतर, षटकाच्या पाचव्या चेंडूवर तिनं सरळ गोलंदाजाच्या डोक्यावरून षटकार हाणला. हा षटकार ९० मीटरचा होता. यानंतर शेवटच्या चेंडूवर तिनं बॅट त्याच दिशेनं स्विंग करत पुन्हा एकदा षटकार मारला. हा षटकार तब्बल 93 मीटर लांब होता. या पाचही षटकारांचा व्हिडिओ बीसीसीआयनं शेअर केला आहे. तुम्ही हा व्हिडिओ येथे पाहू शकता.
6⃣,6⃣,6⃣,6⃣,6⃣ 💥
Kiran Navgire is on a six-hitting spree 😮
What power hitting 🔥🔥#SWOneday | @IDFCFIRSTBank
Scorecard ▶️ https://t.co/7J1zjmRMHX pic.twitter.com/Dn1nQWE4TN
— BCCI Domestic (@BCCIdomestic) December 24, 2024
या सामन्यात किरण नवगिरेनं शानदार फलंदाजी करत अवघ्या 25 चेंडूत 1 चौकार आणि 8 षटकारांच्या मदतीनं 64 धावा केल्या. या दरम्यान तिचा स्ट्राइक रेट 256 होता. किरण 7व्या क्रमांकावर फलंदाजीसाठी मैदानात उतरली होती. तिनं 48.4 षटकात संघाला सर्वबाद 254 धावापर्यंत नेण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिलं. या सामन्यात ती संघासाठी सर्वाधिक धावा करणारी खेळाडू राहिली.
हेही वाचा –
Neeraj Chopra Birthday: भालाफेकीत 2 ऑलिम्पिक पदके जिंकणारा एकमेव भारतीय
बॉक्सिंग डे कसोटीत ट्रॅव्हिस हेड खेळणार की नाही? गाबा कसोटीत झाला होता दुखापतग्रस्त
विराट कोहली ऑफ स्टंप लाईनवर वारंवार आऊट का होतो? कर्णधारानं दिलं मजेशीर उत्तर