अलीकडच्या काळात महिला क्रिकेटची लोकप्रियता वाढली आहे. महिला क्रिकेट अजूनही पुरुषांइतके लोकप्रिय नसले तरी महिला क्रिकेटपटूंनी देखील क्रिकेट जगतापासून ते सोशल मीडियापर्यंत चांगलेच नाव कमावले आहे. भारतीय क्रिकेटपटूंप्रमाणेच महिला क्रिकेटपटूंवरही बायोपिक बनवण्यात आले आहेत. मिताली राज (Mithali Raj) हे त्यातील मोठे नाव आहे. सोशल मीडिया असो की क्रिकेटचे मैदान, सर्वत्र महिला क्रिकेटपटूंचा देखील बोलबाला आहे. तत्पूर्वी या बातमीद्वारे आपण सोशल मीडियावर सर्वाधिक लोकप्रिय असणाऱ्या 3 महिला क्रिकेटर विषयी जाणून घेऊया.
1) स्म्रीती मानधना- स्म्रीती मानधना (Smriti Mandhana) फक्त क्रिकेटच नाही तर तिच्या सौंदर्यामुळे देखील चर्चेत असते. मानधनाच्या सौंदर्याची अनेकदा सोशल मीडियावर चर्चा होत असते. मानधनाचे फक्त तिच्या सोशल मीडिया इंस्टाग्राम हँडलवर सुमारे 11.9 मिलियन फॉलोअर्स आहेत. मानधनाला सोशल मीडियावर नॅशनल क्रश म्हणूनही घोषित करण्यात आले आहे.
View this post on Instagram
2) मिताली राज- भारतीय महिला क्रिकेट संघाची अनुभवी खेळाडू मिताली राजने (Mithali Raj) आपल्या क्रिकेट कारकिर्दीत अनेक मोठे रेकाॅर्ड्स केले आहेत. मितालीचे तिच्या सोशल मीडिया अकाउंट इंस्टाग्रामवर 10 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. मिताली राज सोशल मीडियावर खूप लोकप्रिय आहे. तिचा बायोपिकही बनवण्यात आला आहे, ज्यामध्ये बॉलिवूडची अभिनेत्री तापसी पन्नूने तिची भूमिका साकारली आहे.
View this post on Instagram
3) प्रिया पुनिया- भारतीय महिला क्रिकेटपटू प्रिया पुनियाने (Priya Punia) 2019 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताकडून पदार्पण केले होते. तिने अल्पावधीतच स्टार क्रिकेटर्सच्या यादीत आपले नाव नोंदवले. क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरने प्रियाला तिच्या चमकदार कामगिरीबद्दल सलाम केला आहे. पुनियाच्या सोशल मीडियावरील लोकप्रियतेबद्दल बोलायचे तर ती इतरांपेक्षा खूपच चांगली आहे. पुनियाचे सोशल मीडिया इंस्टाग्रामवर जवळपास 551 हजार फॉलोअर्स आहेत.
View this post on Instagram
महत्त्वाच्या बातम्या-
6 विकेट घेताच जडेजाच्या नावे होणार अनोखा रेकॉर्ड, केवळ 2 भारतीयांनी केली ही कामगिरी
“आजकाल निवृत्ती हा एक…” भारतीय कर्णधाराचे मोठे वक्तव्य
बांगलादेशविरुद्ध रोहित शर्माचा रेकॉर्ड लाजिरवाणा, नेहमीच फ्लॉप झालाय हिटमॅन!