महिला प्रीमियर लीगच्या (WPL 2024) या दुसऱ्या सीजनमध्ये दररोज रोमांचक सामने होत आहेत. आज या सीजनमधील 20 वा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात जायंट्स यांच्यात खेळला गेला. उभय संघांमधील हा सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळला गेला.
या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघानं गुजरात जायंट्सचा सात गडी राखून पराभव केला. या विजयासह दिल्लीनं गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावलं. दिल्ली कॅपिटल्स महिला प्रीमियर लीग 2024 च्या अंतिम फेरीत प्रवेश करणारी पहिली टीम बनली आहे. बुधवारी (13 मार्च) झालेल्या शेवटच्या लीग स्टेज सामन्यात दिल्लीनं गुजरात जायंट्सवर सात विकेट्सनं विजय मिळवला.
गुजरात जायंट्सची कर्णधार बेथ मुनीनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या गुजरात जायंट्स संघानं 20 षटकांत 9 गडी गमावून 126 धावा केल्या. गुजरात जायंट्सकडून भारती फुलमलीनं सर्वाधिक 42 धावांची खेळी खेळली. दिल्ली कॅपिटल्सकडून शिखा पांडे, मारिजाने कॅप आणि मिन्नू मणी यांनी प्रत्येकी 2 विकेट घेतल्या.
लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या दिल्ली कॅपिटल्स संघानं अवघ्या 13.1 षटकांत 3 गडी गमावून लक्ष्य गाठलं. दिल्लीकडून स्टार सलामीवीर शफाली वर्मानं अवघ्या 37 चेंडूत 71 धावा केल्या. गुजरात जायंट्सकडून तनुजा कंवरने सर्वाधिक एक विकेट घेतली. या विजयासह दिल्लीचं गुणतालिकेतील अव्वल स्थान निश्चित झालं आहे. संघानं 8 गेममध्ये 12 गुण प्राप्त केले. तर WPL 2024 मध्ये गुजरात जायंट्सचा संघ फक्त दोन विजयांसह तळाशी राहिला.
दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन :
गुजरात जायंट्स – लॉरा वोल्वार्ड, बेथ मूनी (कर्णधार आणि विकेटकीपर), दयालन हेमलथा, फोबी लिचफिल्ड, ॲशले गार्डनर, भारती फुलमाली, कॅथरीन ब्राइस, तनुजा कंवर, शबनम मो. शकील, मेघना सिंग, मन्नत कश्यप.
दिल्ली कॅपिटल्स – मेग लॅनिंग (कर्णधार), शफाली वर्मा, जेमिमाह रॉड्रिग्स, ॲलिस कॅप्सी, मारिझान कॅप, जेस जोनासेन, राधा यादव, अरुंधती रेड्डी, तानिया भाटिया (विकेटकीपर), शिखा पांडे, मिन्नू मणी.