टीम इंडिया महिला अंडर 19 टी20 आशिया कप 2024 च्या अंतिम फेरीत पोहोचली आहे. सुपर फोरमध्ये भारतीय संघानं दमदार कामगिरी करत श्रीलंकेचा पराभव केला. टीम इंडिया आता फायनलमध्ये बांगलादेशशी भिडणार आहे. बांगलादेशनं सुपर फोरमध्ये नेपाळचा पराभव केला. आयुषी शुक्लानं टीम इंडियासाठी चमकदार कामगिरी केली आहे. भारतीय संघानं स्पर्धेतील एका सामन्यात बांगलादेशचा पराभव केला होता. आता टीम इंडिया जेतेपदापासून केवळ एक पाऊल दूर आहे.
नेपाळ विरुद्ध बांगलादेश सुपर फोर सामन्यात प्रथम फलंदाजी करताना नेपाळनं 8 गडी गमावून अवघ्या 54 धावा केल्या. यादरम्यान कर्णधार पूजा महतो 9 धावा करून बाद झाली. सावित्री धामी 11 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतली. प्रत्युत्तरात, बांगलादेशनं 1 गडी गमावून लक्ष्य गाठलं. बांगलादेशसाठी फाहोमिदानं 26 धावांची खेळी केली. मस्ट इवानं 18 धावांचं योगदान दिलं.
टीम इंडियाचा अंतिम सामना बांगलादेशविरुद्ध होणार आहे. भारतानं या स्पर्धेत आतापर्यंत चमकदार कामगिरी केली आहे. यापूर्वीच्या सामन्यात भारतानं बांगलादेशचा पराभव केला होता. भारतीय संघानं हा सामना 8 गडी राखून जिंकला होता. यापूर्वी भारतानं या स्पर्धेत पाकिस्तानचाही पराभव केला होता. त्यामुळे अंतिम फेरीत बांगलादेशला कडवी टक्कर मिळणार आहे.
भारतीय गोलंदाज आयुष शुक्लानं या स्पर्धेत वर्चस्व गाजवलंय. तिनं आतापर्यंत 7 विकेट घेतल्या आहेत. सुपर फोरच्या सामन्यातही आयुषीनं अप्रतिम गोलंदाजी केली होती. आता तिच्याकडून अंतिम फेरीतही चांगली कामगिरी करण्याची अपेक्षा असेल. भारतासाठी जी त्रिशानं फलंदाजीत कमाल केली आहे. तिनं आतापर्यंत 107 धावा केल्या आहेत.
हेही वाचा –
“तेव्हा विराट कोहली अक्षरश: रडणार होता…”, बॉलिवूड अभिनेत्यानं केला धक्कादायक खुलासा
राशिद खान बनला कर्णधार, आयपीएलच्या आगामी हंगामापूर्वी ‘या’ संघाने सोपवली जबाबदारी
IND vs AUS: मेलबर्नमध्ये भारतासाठी सर्वाधिक कसोटी धावा कोणी केल्या, पाहा आकडेवारी