महिला आशिया चषकाचा (Women’s Asia Cup) फायनल सामना भारत विरुद्ध श्रीलंका (India vs Sri Lanka) यांच्यामध्ये खेळला जाणार आहे. (28 जुलै) रोजी दोन्ही संघ आमने-सामने असणार आहेत. दांबुला क्रिकेट स्टेडियमवर भारत आणि श्रीलंका यांच्यामधील अटातटीची लढत पाहायला मिळणार आहे. भारत 8व्यांदा महिला आशिया चषकाच्या ट्राॅफीवर नाव कोरण्यासाठी सज्ज असेल तर श्रीलंका पहिल्या जेतेपदाचा मान मिळवण्यासाठी भारतीय संघासोबत लढण्यासाठी मैदानात उतरेल.
भारतानं यंदाच्या आशिया चषक स्पर्धेत 4 सामने खेळले आहेत. त्यामध्ये त्यांनी चारही सामने जिंकले आहेत. तर सेमीफायनल सामन्यात बांगलादेशचा पराभव करुन फायनलमध्ये धडक मारली. फायनलमघ्ये भारताचा सामना श्रीलंका संघाशी होणार आहे. भारतानं पहिल्या सामन्यात पाकिस्तानचा पराभव करुन यंदाच्या स्पर्धेला विजयी सलामी दिली होती. दुसऱ्या सामन्यात युएई संघाचा पराभव केला तर तिसऱ्या सामन्यात नेपाळचा पराभव केला.
श्रीलंका संघाबद्दल बोलायचं झालं तर श्रीलंका संघ सुद्धा यंदाच्या आशिया चषक स्पर्धेत अपराजित राहिला आहे. 4 सामने खेळून त्यांनी चारही सामन्यात विजय मिळवला. पहिल्या सामन्यात बांगलादेशचा धुव्वा उडवला. तर दुसऱ्या सामन्यात मलेशियाचा 144 धावांनी दारुण पराभव केला. थायलंड संघाला तिसऱ्या सामन्यात नमवून सेमीफायनलमध्ये धडक मारली होती. सेमीफायनलमध्ये त्यांनी पाकिस्तानचा पराभव करुन फायनलमध्ये धडक मारली. आता फायनल सामन्यात त्यांना पहिले जेतेपद मिळवण्यासाठी भारताचा सामना करावा लागणार आहे.
भारतानं आतापर्यंत 8 आशिया चषक स्पर्धेत 7 जेतेपदांचा मान मिळवला आहे. तर श्रीलंका संघ अद्याप एकही जेतेपद जिंकू शकला नाही. यंदाच्या आशिया चषकाचे यजमान श्रीलंका आहे. त्यामुळे त्यांना घरच्या मैदानावर भारताचा पराभव करुन पहिले जेतेपद मिळवण्याची संधी असणार आहे. तर भारतीय महिला संघ 8व्यांदा आशिया चषकाच्या जेतेपदावर नाव कोरण्यासाठी सज्ज असणार आहे.
भारत- हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्म्रीती मानधना (उपकर्णधार), शफाली वर्मा, दीप्ति शर्मा, जेमिमा रोड्रिग्स, रिचा घोष (यष्टीरक्षक), उमा छेत्री, पूजा वस्रकार, अरुंधती रेड्डी, रेणुका सिंह ठाकुर, दयालन हेमलता, आशा शोभना, राधा यादव, श्रेयंका पाटील, सजना जीवन.
श्रीलंका- चामरी अटापट्टू (कर्णधार), अनुष्का संजीवनी, हर्षिता समरविक्रमा, हसिनी परेरा, अमा कांचना, उदेशिका प्रबोधनी, विशामी गुणरथने, काव्या कविंदी, इनोशी प्रियदर्शिनी, सुगंधिका कुमारी, अचिनी कुलसूरिया, कावीशा दिलहारी, नीलाक्षी डी सिल्वा, सचिनी निसानसाला, शशिनी गिम्हाणी
महत्त्वाच्या बातम्या-
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भोंगळ कारभार; भारतीय खेळाडूंना जेवण मिळालं नाही, प्रवास करतानाही अडचणी
केएल राहुलचा राऊडी अंदाज! श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेपूर्वी उडवलं ‘फायटर प्लेन’; VIDEO व्हायरल
‘कोच नाही…’, गौतम गंभीर टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक बनल्याने माजी दिग्गज खेळाडू नाराज?