यंदाचा महिला आशिया चषक (Women’s Asia Cup) श्रीलंकेमध्ये सुरु आहे. त्यामध्ये 8 संघ आशिया चषकासाठी भिडत आहेत. (23 जुलै) रोजी पाकिस्तान विरुद्ध युएई झालेल्या सामन्यात पाकिस्ताननं युएई संघाचा 10 गडी राखून दारुण पराभव केला. पहिल्याच सामन्यात भारतानं पराभूत केल्यानंतर पाकिस्तान महिला संघानं जोरदार पुनरागमन करत सलग दुसरा विजय मिळवला.
तत्पूर्वी पाकिस्ताननं टाॅस जिंकून युएई संघाला पलंदाजीसाठी पाचारण केलं होतं. प्रत्युत्तरात युएईनं निर्धारित 20 षटकात 8 गडी गमावून केवळ 103 धावाच केल्या. त्यामध्ये युएईची यष्टीरक्षक सलामीवीर तीर्था सतीशनं (Theertha Satish) 36 चेंडूत सर्वाधिक 40 धावा ठोकल्या. तर कर्णधार ईशा रोहित ओझा (Esha Rohit Oza)16 आणि खुशी शर्माच्या (Khushi Sharma) 12 धावांच्या खेळीवर युएईनं पाकिस्तानसमोर 104 धावांचं आव्हान ठेवलं होतं.
युएईनं दिलेल्या 104 धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानच्या सलामी जोडीनं 14.1 षटकात 107 धावा केल्या. त्यांनी एकही विकेट न गमावता सामना जिंकला. दोन्ही सलामीवीर खेळाडूंनी 107 धावांची भागीदारी रचली. गुल फीरोझानं 55 चेंडूत 62 धावांची अर्धशतकी खेळी खेळली. त्यामध्ये तिनं 8 चौाकर लगावले. तर यष्टीरक्षक मुनीबा अलीनं 37 धावांची उत्कृष्ट खेळी खेळली. या सामन्याचा सामनावीर पुरस्कार 62 धावांची खेळी केलेल्या गुल फीरोझाला देण्यात आला.
पाकिस्तानसाठी गोलंदाजी करताना सादिया इक्बाल (Sadia Iqbal), नशरा संधू आणि तुबा हसन (Tuba Hassan) आणि यांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या. तर कर्णधार निदा दारनं (Nida Dar) 1 विकेट घेतली. या विजयासहित पाकिस्तान संघानं सेमीफायनलमधील तिकीट पक्कं केलं.
महत्तवाच्या बातम्या-
“एक दिवस शुबमन गिल क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांमध्ये भारताचे नेतृत्त्व करेल”, माजी फलंदाजी प्रशिक्षकाचा खुलासा
मुंबई क्रिकेट असोसिएशनला मिळाला नवा अध्यक्ष,संजय नाईक यांचा दारुण पराभव
आयसीसीचा युएसए संघावर कारवाईचा बडगा, 12 महिन्यांसाठी टीमला केले निलंबित; कारण काय?