बांगलादेश येथे सुरू असलेल्या महिला आशिया चषक (Asia Cup) 2022चा दुसरा सामना भारत विरुद्ध श्रीलंका (INDvSL) यांच्यात खेळला जात आहे. हा सामना शनिवारी (1 ऑक्टोबर) सिलहेट आउटर क्रिकेट स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात भारताने जेमीमाह रोड्रिगेझ आणि हरमनप्रीत कौर यांच्या भागीदारीने दीडशतकी धावसंख्या उभारली आहे. जेमीमाहने महत्वाची खेळी केल्याने भारताने 20 षटकात 6 विकेट्स गमावत 150 धावा केल्या.
श्रीलंकेने नाणेफेक जिंकत भारताला प्रथम फलंदाजी करण्याचे आव्हान दिले. यावेळी सुरूवातीलाच भारताचा संघ अडखळला. शेफाली वर्मा आणि स्म्रीती मंधाना यांनी लवकरच आपल्या विकेट्स गमावल्या. दोघींनी अनुक्रमे 10 आणि 6 धावा करत बाद झाल्या. सामन्यात भारताच्या डावाची 4 षटके पूर्ण झाली असता धावसंख्या 2 विकेट्स गमावत 23 एवढी होती. भारताची स्थिती वाईट असताना तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला येत जेमीमाह रोड्रिगेझ (Jemimah Rodrigues) हीने अर्धशतकी खेळी केली आहे. तिने कर्णधार हरमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur) हीच्या साथीने भारताचा धावफलक हलता ठेवला.
जेमीमाह-हरमनप्रीत जोडीने 71 चेंडूत 92 धावांची भागीदारी केली. हरमनप्रीत 30 चेंडूत 33 धावा करत बाद झाली. तसेच जेमीमाह 53 चेंडूत 76 धावा करत बाद झाली. तिने दुखापतीतून परल्यावर भारतासाठी चांगली कामगिरी केली आहे. तिने या सामन्यात 143.40च्या स्ट्राईक रेटने खेळताना 11 चौकार आणि एक षटकार खेचला. तिचे हे आंतरराष्ट्रीय टी20मधील आठवे अर्धशतक ठरले. त्याचबरोबर तिची ही आंतरराष्ट्रीय टी20मधील सर्वोच्च वैयक्तिक खेळी ठरली आहे. तिला श्रीलंकेची कर्णधार चमीरा अट्टापट्टू हीने त्रिफळाचीत केले. नंतर आलेल्या दयालन हेमलता हीने 10 चेंडूत एक चौकाराच्या साहाय्याने नाबाद 13 धावा केल्या.
https://twitter.com/BCCIWomen/status/1576125414140846082?s=20&t=ld4HhtHfNmCgpKPEJ271jg
भारताची विकेटकीपर रीचा घोष हीच्याकडून चांगल्या खेळीची अपेक्षा होती, मात्र ती 6 चेंडूत एक षटकार खेचत 9 धावांवरच बाद झाली. पूजा वस्त्राकार ही पण एक धावेववर असताना धावबाद झाली. यावेळी श्रीलंकेकडून ओशाडी राणासिंगे हीने उत्तम गोलंदाजी केली. तिने 4 षटकात 32 धावा देत 3 विकेट्स घेतल्या. तिने घेतलेल्या विकेट्सपैकी शफाली आणि हरमनप्रीत या श्रीलंकेसाठी महत्वाच्या ठरल्या. तर श्रीलंकेची कर्णधार अट्टापट्टूने एकच षटक टाकताना 8 धावा देत जेमीमाहची विकेट घेतली.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
स्टेडियमबाहेर जमलेल्या गर्दीला पंतने केले खुश! दुसऱ्या टी-20 सामन्यापूर्वीचा व्हिडिओ व्हायरल
T20 World Cup 2022: टीम इंडियामध्ये दोन बदल! वेगवान गोलंदाजांची संघामध्ये एंट्री
BIG NEWS: जसप्रीत बुमराह संघासोबत ऑस्ट्रेलियाला जाणार नाही! जाणून घ्या भारताचे ‘ट्रॅव्हल प्लॅनिंग’





