पुणे| शनिवारी (२८ मे) महिला टी२० चॅलेंज २०२२चा अंतिम सामना व्हेलोसिटी विरुद्ध सुपरनोव्हाज संघात खेळला गेला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना सुपरनोव्हाजने निर्धारित २० षटकात ७ विकेट्सच्या नुकसानावर १६५ धावा केल्या. सुपरनोव्हाजकडून डिएंड्रा डॉटिनने सर्वाधिक ६२ धावा केल्या. तसेच कर्णधार हरमनप्रीत कौरने ४३ धावांचे योगदान दिले.
प्रत्युत्तरात व्हेलोसिटीकडून लॉरा वॉलवार्टच्या झुंजार अर्धशतकी खेळीव्यतिरिक्त इतर फलंदाजांनी नांग्या टाकल्या. परिणामी व्हेलोसिटीला २० षटकांमध्ये ८ विकेट्स गमावत १६१ धावाच करता आल्या. अशाप्रकारे सुपरनोव्हाजने ४ धावांनी हा सामना जिंकला.
हरमनप्रीतच्या (Harmanpreet Kaur) नेतृत्त्वाखालील सुपरनोव्हाजने (Supernovas) आयपीएल ट्रॉफी जिंकण्याची ही तिसरी वेळ आहे. महिला टी२० चॅलेंजच्या ४ हंगामांच्या इतिहासात सुपरनोव्हाजने सर्वाधिक वेळा ट्रॉफी जिंकली आहे. यापूर्वी २०१८ आणि २०१९ मध्ये सुपरनोव्हाजने आयपीएल ट्रॉफीवर आपले नाव कोरले होते. तर व्हेलोसिटीने अंतिम सामन्यात पोहोचण्याची ही दुसरी वेळ होती व दोन्हीही वेळी त्यांना सुपरनोव्हाजनेच पराभूत केले होते. तसेच ट्रेलब्लेझर्स संघ केवळ एक वेळा, २०२० मध्ये विजेतेपद पटकावले होते.
दरम्यान महिला टी२० चॅलेंज २०२२च्या (Women T20 Challenge 2022) हंगामात अनेक विक्रमतोड गोष्टी घडल्या आहेत. सर्वोच्च सांघिक धावसंख्या, सर्वोच्च धावसंख्येचा यशस्वी पाठलाग आणि बरेच विक्रम झाले आहेत. या हंगामातील अशाच काही आकड्यांचा येथे आढावा घेण्यात आला आहे.
C. H. A. M. P. I. O. N. S! 🏆
Congratulations to Team Supernovas – the winner of the #My11CircleWT20C 2022. 🙌 🙌#SNOvVEL pic.twitter.com/5g35zIFeNk
— IndianPremierLeague (@IPL) May 28, 2022
पुरस्कार
विजेते: सुपरनोव्हाज – २५ लाख रु
माय ११ सर्कल परफॉर्मर ऑफ द मॅच (अंतिम सामन्यातील सामनावीर): डिएंड्रा डॉटिन (सुपरनोव्हाज) – ४४ चेंडूत ६२ धावा – रु १ लाख
NFT विजयी क्षण: सोफी एक्लेस्टोन (सुपरनोव्हाज) – रु १ लाख
फ्लॅश सुपरस्टार ऑफ द डे: डिएंड्रा डॉटिन (सुपरनोव्हाज) – ९४ पॉइंट्स – १ लाख रु
बूस्ट स्टॅमिना स्टार ऑफ द मॅच: डिएंड्रा डॉटिन (सुपरनोव्हाज) – २६२ पॉइंट्स – १ लाख रु
माय ११ सर्कल चॅम्पियन परफॉर्मर ऑफ द टूर्नामेंट (मालिकावीर) ): डिएंड्रा डॉटिन (सुपरनोव्हाज) – १३७ गुण – २.५० लाख रु
महिला टी२० चॅलेंज स्पर्धेतील मोडलेले विक्रम
सर्वोच्च सांघिक धावसंख्या: १९०/५ ट्रेलब्लेझर्स विरुद्ध व्हेलोसिटी
अंतिम सामन्यात सर्वोच्च सांघिक धावसंख्या: १६५/७ सुपरनोव्हाज विरुद्ध व्हेलोसिटी
सर्वोच्च सांघिक धावसंख्येचा यशस्वी पाठलाग: १५१ व्हेलोसिटी विरुद्ध सुपरनोव्हाज
एका हंगामात सर्वाधिक षटकार: ३३
एका डावात सर्वाधिक षटकार: १०, सुपरनोव्हाज विरुद्ध व्हेलोसिटी अंतिम सामना
एका सामन्यात सर्वाधिक षटकार: १३, सुपरनोव्हाज विरुद्ध व्हेलोसिटी अंतिम सामना
सर्वात वेगवान अर्धशतक: किरण नागविरे, २५ चेंडू (व्हेलोसिटी)
महिला टी२० चॅलेंज २०२२ स्पर्धेतील आकडेवारी
सर्वोच्च सांघिक धावसंख्या: १९०/५ ट्रेलब्लेझर्स विरुद्ध व्हेलोसिटी
निच्चांकी सांघिक धावसंख्या: ११४/९ ट्रेलब्लेझर्स विरुद्ध सुपरनोव्हाज
सर्वोच्च सांघिक धावसंख्येचा यशस्वी पाठलाग: १५१ व्हेलोसिटी विरुद्ध सुपरनोव्हाज
सर्वात कमी धावसंख्येचा यशस्वी बचाव: १६३ सुपरनोव्हाज विरुद्ध ट्रेलब्लेझर्स
सर्वाधिक धावा: हरमनप्रीत कौर, सुपरनोव्हाज – ३ डावात १५१ धावा
सर्वाधिक विकेट्स: पूजा वस्त्राकर (सुपरनोव्हाज) – ३ डावात ६ विकेट्स
एकूण अर्धशतके: ८
सर्वाधिक अर्धशतके: लॉरा वॉलवार्ट (व्हेलोसिटी) – ३ डावात २ अर्धशतके
एकूण षटकार: ३३
सर्वाधिक षटकार: हरमनप्रीत कौर, सुपरनोव्हाज – ३ डावात ६ षटकार
एकूण चौकार: १२९
सर्वाधिक चौकार: शेफाली वर्मा – ३ डावात १७ चौकार
सर्वाधिक विकेट्स (यष्टीरक्षक): तानिया भाटिया (सुपरनोव्हाज) – ३ डावात ४ झेल (३ झेल आणि १ यष्टीचीत)
सर्वाधिक झेल: स्म्रीती मंधाना (ट्रेलब्लेझर्स) – २ डावात ३ झेल, हरमनप्रीत कौर (सुपरनोव्हाज) – ३ डावात ३ झेल
सर्वोत्तम गोलंदाजी इकॉनॉमी रेट (किमान ८ षटके): डिएंड्रा डॉटिन – ६.००
सर्वोत्तम फलंदाजी स्ट्राइक रेट (किमान ५० धावा): शेफाली वर्मा (व्हेलोसिटी) – १६९.६४
महास्पोर्ट्सचा वॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
IPL Final | विजेत्या-उपविजेत्या संघावरच नाही, तर पुरस्कार विजेत्या खेळाडूंवरही पडणार पैशांचा पाऊस
‘कधी तुम्ही जिंकता, कधी हारता, पण…’, आरसीबीच्या चाहत्यांसाठी विराटची हृदयाला भिडणारी पोस्ट