---Advertisement---

भारताच्या मोठ्या विजयानं बदललं संपूर्ण चित्र, आता सेमीफायनलचं समीकरण जाणून घ्या

On: गुरूवार, ऑक्टोबर 10, 2024 7:37 PM
---Advertisement---

हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघानं महिला टी20 विश्वचषकात श्रीलंकेचा 82 धावांनी पराभव केला. टी20 विश्वचषकात धावांच्या बाबतीत भारताचा हा आतापर्यंतचा सर्वात मोठा विजय आहे.

भारतीय संघाच्या या विजयानं पॉइंट टेबल आणि सेमीफायनलची शर्यत पूर्णपणे बदलली आहे. नेट रनरेटच्या आधारे न्यूझीलंडला मागे सोडण्यासाठी भारताला हा सामना किमान 45 धावांनी जिंकावा लागणार होता. परंतु भारताने हा सामना त्यापेक्षा कितीतरी मोठ्या फरकानं जिंकला. अशा परिस्थितीत आता टीम इंडियाच्या रन रेटमध्ये मोठी वाढ झाली आहे. जर टीम इंडियानं आपल्या शेवटच्या सामन्यात आणखी एक मोठा विजय नोंदवला, तर ते उपांत्य फेरीसाठी सहज पात्र ठरतील.

भारताचे आता तीन सामन्यांतून दोन विजय आणि एक पराभवासह चार गुण आहेत. भारताचा रन रेट आता +0.576 आहे. भारताविरुद्धच्या पराभवामुळे श्रीलंका टी20 विश्वचषकातून बाहेर पडला आहे. या सामन्यापूर्वी भारत गुणतालिकेत चौथ्या स्थानावर होता आणि फक्त श्रीलंका त्यांच्या खाली होती. पण आता भारत दुसऱ्या स्थानावर आहे, तर पाकिस्तान तिसऱ्या आणि न्यूझीलंड चौथ्या स्थानावर आहे. मात्र, या गटात भारत आणि श्रीलंका हे दोनच संघ आहेत, ज्यांनी आतापर्यंत प्रत्येकी तीन सामने खेळले आहेत. याचाच अर्थ न्यूझीलंडकडे अजूनही भारताला मागे सोडण्याची संधी आहे.

श्रीलंकेविरुद्धच्या या मोठ्या विजयामुळे भारताचा उपांत्य फेरीचा मार्ग सुकर झाला आहे. आता जर भारतीय संघानं आपला पुढचा सामना मोठ्या फरकानं जिंकला, तर ते 6 गुणांसह ग्रुप स्टेजचा शेवट करतील. याशिवाय ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड किंवा पाकिस्तानलाही प्रत्येकी 6 गुण मिळवण्याची संधी आहे. अशा स्थितीत ज्या दोन संघांचे नेट रनरेट चांगले असतील, ते सहा गुणांसह उपांत्य फेरीत प्रवेश करतील.

हेही वाचा – 

“यात काही शंका नाही…”, बांगलादेशी खेळाडूनं कबूल केलं भारताचं वर्चस्व
बाबर आझमची कसोटी कारकीर्द संपली? मुलतानच्या पाटा खेळपट्टीवरही धावा निघेना
इंग्लंडविरुद्ध पाकिस्तानच्या 6 गोलंदाजांचं ‘शतक’, 20 वर्षांनंतर बनला मोठा रेकॉर्ड

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---